कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, सराईत गुन्हेगाराची हत्या; दानोळीत खळबळ

मुंबई तक

21 Oct 2026 (अपडेटेड: 21 Oct 2026, 11:34 AM)

Kolhapur Crime News : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे भरदिवसा गोळीबारात 43 वर्षीय महेश बजरंग दळवी यांची हत्या झाली. दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

Kolhapur Crime News

Kolhapur Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार

point

सराईत गुन्हेगाराची हत्या; दानोळीत खळबळ

Kolhapur Crime News, दीपक सुर्यवंशी :  कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दानोळी गावात भरदिवसा गोळीबार करून महेश दळवी यांची हत्या करण्यात आली. दोन अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात 43 वर्षीय महेश बजरंग दळवी यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास चांदोली वसाहत परिसरात ही घटना घडली. दोन अज्ञात हल्लेखोरांनी महेश दळवी यांच्यावर गोळीबार केला. डोक्यात आणि मानेवर गोळ्या लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे दानोळी गावासह परिसरात खळबळ उडाली आहे. महेश दळवी यांची पोलिसांच्या नोंदीत सराईत गुन्हेगार म्हणून नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.

हे वाचलं का?

अज्ञात हल्लेखोरांनी मागून येत केला गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार, महेश बजरंग दळवी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास चांदोली वसाहत परिसरातून आपल्या शेताकडे जात होते. याच वेळी दोन अज्ञात हल्लेखोरांनी मागून येत त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात डोक्यात आणि मानेवर गोळ्या लागल्याने महेश दळवी यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात घबराट पसरली. शिरोळ तालुक्यात भरदिवसा घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

हेही वाचा : गोकुळमध्ये सतेज पाटील यांचा विजय, हर्षदा जाधव देशमुख काय म्हणाल्या?

महेश दळवी यांच्याविरोधात पोलिसांत हत्येसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती आहे. त्यामुळे जुन्या वादातून ही हत्या झाली असावी, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याने या घटनेबाबत परिसरात विविध चर्चा सुरू आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे दानोळी आणि आसपासच्या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर महेश दळवी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, रुग्णालयाच्या परिसरात महेश दळवी यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. भरदिवसा झालेल्या या गोळीबारात महेश दळवी यांचा मृत्यू झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या घटनेमुळे दानोळी गावासह शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.