सैराट… ऑनर किलिंगच्या घटनेने राज्य हादरलं, बहिणीचे भावाने कोयत्यानेच केले तुकडे!

मुंबई तक

07 Dec 2023 (अपडेटेड: 07 Dec 2023, 12:33 PM)

आपल्या बहिणीचे दलित मुलाबरोबर प्रेमसंबंध असल्याचे भावाला कळताच कोयत्याने वार करून बहिणीचे तुकडे केले. ही घटना तामिळनाडूमध्ये घडली असून राज्य हादरून गेलं आहे. बहिणीची हत्या करून भाऊ पोलिसात स्वतः हजर झाल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती समजली.

honor killing in tamil nadu brother cuts sister to pieces

honor killing in tamil nadu brother cuts sister to pieces

follow google news

Tamil Nadu Crime : तामिळनाडूतील (Tamilnadu) तिरुनेलवेलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या बहिणीने दलित मुलावर प्रेम (Love Affairs) केल्याच्या कारणावरून अल्पवयीन भावाने (minor brother) सख्ख्या बहिणीचे (Sister Murder) कोयत्याने तुकडे केले आहेत. तिरुनेलवेलीच्या थलाईयुथू पोलीस ठाण्याच्या राजवल्लीपुरम परिसरात ही घटना घडली आहे. आपल्या बहिणीने दलित (Dalit) मुलावर प्रेम का केले असा सवाल करून त्याने घरातच कोयत्याने वार करून तिला संपवले आहे.

हे वाचलं का?

बहिणीचे दलित मुलाबरोबर प्रेमसंबंध

बहिणीची हत्या करून झाल्यानंतर अल्पवयीन भाऊ पोलिसात हजर झाला व त्याने आपला स्वतःचा गुन्हा कबूल केला. भावाने पोलिसांना आपण बहिणीची हत्या केल्याचे सांगितल्यानंंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशीला सुरुवात केली. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन भावाने आपल्या बहिणीचे एका दलित मुलाबरोबर प्रेमसंबंध असल्याचे सहन झाले नव्हते. त्यावरून त्यांच्यामध्ये वादही झाला होता. 20 वर्षाची असलेली ए. थांगथाई ही गंगाईकोंडानमधील सिपकोट औद्योगिक वसाहतीत एका खाजगी कंपनीत कामाला होती. त्यावेळी तिचे एका दलित समाजातील मुलाबरोबर प्रेमसंबंध जुळले होते.

हेही वाचा>> Crime : उष्ट्या प्लेटमुळे वेटरचा जीवच घेतला, लग्नात काय घडलं?

चित्रपट पाहायला गेली अन्…

या दोघांचे प्रेमसंबंध होते हे त्यांच्या घरातील लोकांना माहिती नव्हते. मात्र ही दोघंही काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहातून बाहेर येताना त्यांच्या कुटुंबीयांना दिसली होती. मुलगी चित्रपटगृहातून घरी आल्यानंतर त्या गोष्टीवरून मुलीच्या घरात प्रचंड वाद झाले होते, आणि त्याच रात्री ती बेपत्ता झाली. मात्र त्यावेळी तिला पोलिसांनी शोधून काढले त्यावेळी ती तिच्या मित्राच्या घरी होती असं स्पष्ट केले होते.

बॉयफ्रेंडसोबत एक रात्र

पोलिस महानिरीक्षक के. एस. नरेंथिरन नायर यांनी सांगितले की, “पोलिसांनी तिला सरकारी महिला संरक्षण गृहात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. मात्र तिने त्यावेळी मी माझ्या पालकांसोबतच राहणार असल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर ती जेव्हा घरी आली तेव्हा तिच्या 17 वर्षाच्या भावाने तिच्याबरोबर वाद घातला होता. दिवसभर त्या दोघांचे वाद सुरुच होते, मात्र रात्री 10 वाजता त्याने आपल्या बहिणीची हत्या केल्याची घटना घडली.

बहिणीला कोयत्यानं तोडलं

बहिणीने दलित मुलावर प्रेम केले याचा राग भावाच्या मनात होता, त्यावरून त्याने बहिणीबरोबर वाद घातला होता. 5 डिसेंबर रोजी त्यांच्यामध्ये जोरदार वाद होऊन त्याने घरात असलेल्या हत्याराने बहिणीवर वार केला आणि तिची हत्या केली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले मात्र रक्तस्त्राव जास्त झाल्याने डॉक्टरानी तिला मृत घोषित केले. मुलीवर स्वतःच्या भावाने हल्ला केल्याचे लक्षात येताच पोलिसांनी बहिणीच्या प्रियकरालाही सुरक्षा दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

    follow whatsapp