New Jersey: Birth Day बनला Death Day.. भारतातील कुटुंबाचा अमेरिकेत भयानक अंत

मुंबई तक

06 Oct 2023 (अपडेटेड: 06 Oct 2023, 03:07 PM)

अमेरिकेत राहणाऱ्या उत्तर प्रदेशमधील कुटुंब एका रात्रीत संपलं आहे. पती-पत्नी आणि दोन मुलांचा करुण अंत झाल्याने उत्तर प्रदेशातील त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आयआयटीमधून बाहेर पडून मोठ्या कंपनीत नोकरीला असतानाही या कुटुंबाचा एकाच रात्रीत कसा अंत झाला असा सवाल निर्माण झाला आहे.

Indian family terrible dead new jersey America Birth Day became Death Day

Indian family terrible dead new jersey America Birth Day became Death Day

follow google news

Family Murder : अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय कुटुंबाबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील ओराईमधील (Uttar Pradesh Orai) असलेले संपूर्ण कुटुंब अमेरिकेत (America) होते. मात्र बुधवारी त्यांच्याच घरात पती, पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. न्यूजर्सी (New Jersey) येथे राहत असलेले तेज प्रताप यांची पत्नी आणि मुलगा आणि मुलगी या सर्वांचे मृतदेह त्यांच्याच घरात सापडल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेची माहिती पहिल्यांदा त्यांचे मेहुणे सत्यम परिहार (Satym Parihar) यांना मिळाली होती.

हे वाचलं का?

रक्ताच्या थारोळ्यात कुटुंब

अमेरिकतेली वृत्तसंस्थेतील एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार तेज प्रताप, व त्यांची पत्नी सोनल, त्यांचा 10 वर्षाचा मुलगा आयुष आणि त्यांची 7 वर्षाची मुलगी एमी यांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आले आहेत. ही घटना समजल्यानंतर तेथील प्रशासानाने त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देऊन मृतदेहांचे शवविच्छेदन करुन सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

हे ही वाचा >> Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलनात फूट?, जरांगे-पाटलांविरोधात कोणी घेतली भूमिका?

उच्च शिक्षित तेज प्रताप

उत्तर प्रदेशमधील असलेले पण सध्या अमेरिकेत स्थायिक झालेले 45 वर्षीय तेज प्रताप सिंह यांनी कानपूर आयआयटीमधून बीटेक केले होते. 2009 साली तेज अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये स्थायिक झाले होते. तर 2019 मध्ये तेजने स्वतःच घर विकत घेऊन ते त्यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांसमवेत राहत होते.

हे ही वाचा >> NCP Crisis : अजित पवारांनी थोपटले दंड, शरद पवार ECI च्या कोर्टात, काय झालं?

घरावर पसरली शोककळा

तेज प्रताप यांच्या कुटुंबीयांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या उत्तर प्रदेशातील घरात समजताच त्यांच्या घरात शोककळा पसरली. अमेरिकेतून जेव्हा या घटनेचे वृत्त समजले तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांच्या घरी पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सात्वंन केले. एकाच कुंटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने या मृत्यूचे गूढ वाढत चालले आहे. मात्र तपास सुरु करण्यात आला आहे.

    follow whatsapp