The Kerala Story वादात मुख्यमंत्र्यांची उडी; म्हणाले, ‘हा संघाचा प्रचारचा…’

मुंबई तक

• 11:32 AM • 30 Apr 2023

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरुन सुरु झालेल्या वादावर आता केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Kerala Chief Minister Pinarayi Vijayan has now reacted to the controversial movie 'The Kerala Story'

Kerala Chief Minister Pinarayi Vijayan has now reacted to the controversial movie 'The Kerala Story'

follow google news

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरुन सुरु झालेल्या वादावर आता केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा पुढे करुन राज्याला धार्मिक कट्टरतेचे केंद्र दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. तसंच यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराचा प्रचार केला जात आहे,  अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. (Kerala Chief Minister Pinarayi Vijayan has now reacted to the controversial movie ‘The Kerala Story’)

हे वाचलं का?

मुख्यमंत्री विजयन यांनी संघावर केले आरोप :

‘द केरळ स्टोरी’चा टीझर रिलीज झाल्यापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावर आता मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले की, लव्ह जिहादसारखे मुद्दे न्यायालय, तपास यंत्रणा आणि अगदी केंद्रीय गृह मंत्रालयाने फेटाळून लावले आहेत. पण या चित्रपटाचा ट्रेलर जातीय ध्रुवीकरण आणि राज्याविरुद्ध द्वेष पसरवण्याच्या कथित उद्देशाने ‘जाणूनबुजून तयार’ केलेला दिसतो. जगासमोर केरळची बदनामी हा चित्रपटाचा मुख्य आधार म्हणून दाखवण्यात आल्याचही त्यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : Ponniyin Selvan – 2 : पहिल्याच दिवशी चांगली कमाई, हिंदीतही जमवला मोठा गल्ला

चित्रपटाच्या टीझरवरून निर्माण झाला वाद :

विजयन पुढे म्हणाले की, अशा प्रकारचा प्रोपगंडा चित्रपट आणि त्यात दाखवलेला मुस्लिमांबद्दलचा द्वेष हे केरळमध्ये राजकीय फायदा मिळवण्याच्या संघ परिवाराच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पाहिले पाहिजे. केरळमध्ये धार्मिक सलोखा नष्ट करण्याचा आणि जातीयवादाची विषारी बीजे पेरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी संघ परिवारावर केला. काही दिवसांपूर्वी, केरळमधील सत्ताधारी सीपीआय (एम) आणि विरोधी काँग्रेस या दोघांनीही केरळ स्टोरी चित्रपटावर जोरदार टीका केली होती.

पत्रकाराने ही मागणी केली होती

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर तामिळनाडूतील एका पत्रकाराने केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना पत्र लिहिले होते. यात केरळ सरकारने चित्रपटाच्या दिग्दर्शकाला बोलावून टीझरच्या सत्यतेची चौकशी करावी अशी मागणी केली होती. या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरमध्ये केरळमधील 32,000 मुलींना बळजबरीने इस्लाममध्ये धर्मांतरित करण्यात आले  आणि नंतर त्या ISIS मध्ये गेल्या होत्या, असे दाखविण्यात आले आहे.

हे ही वाचा : बहीण हवी तर अशी… आलिया भट्टने बहिणीसाठी खर्च केले करोडो रुपये, पण कसे?

टीझरमध्ये काय दाखवले होते?

‘द केरला स्टोरी’ चित्रपटामध्ये केरळमधील 32,000 महिलांची हृदयद्रावक कथा दाखविण्यात आली आहे. महिलांना ISIS (इस्लामिक इराक आणि सीरिया) या दहशतवादी गटांमध्ये सामील होण्यासाठी कट्टरपंथी बनविण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. यावरूनच वादाला तोंड फुटले आहे. टीझरमध्ये अदा शर्मा बुरख्यात दिसून येत आहे. हिंदू धर्मातून इस्लाम धर्मात पाठविण्यात आल्याच ती सांगत आहे. याशिवाय शालिनी उन्नीकृष्णनला फातिमा बनवण्यात आले. तिला नर्स बनून जनतेची सेवा करायची होती, पण ती दहशतवादी बनते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. विपुल अमृतलाल शाह हे निर्मिते आहेत. चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर समोर येताच वादाला तोंड फुटले आहे.

    follow whatsapp