Mazi Ladki Bahin Yojana Latest News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरिब महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात सुरु झालेल्या या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सात हफ्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. परंतु, अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशातच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत ट्वीटरवर अत्यंत महत्त्वाची माहिती शेअर केलीय.
ADVERTISEMENT
पहिल्या ट्वीटमध्ये आदिती तटकरे म्हणाल्या, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना !दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतून वगळण्यात येत आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला - २,३०,००
वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला - १,१०,०००, कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला - १,६०,०००..एकूण अपात्र महिला - ५,००,०००.
हे ही वाचा >> Delhi Election Result: 'लढा अजून आपआपल्यात...', कोणी साधला काँग्रेस-आपवर निशाणा?
तसच आदिती तटकरे यांनी दुसरं ट्वीटर करत म्हटलंय की, सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तथापि, कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी".
हे ही वाचा >> Delhi Election 2025: भाजपने कमाल केली, राजधानीत कमळ फुलणार.. पाहा विधानसभा निवडणुकीचा निकाल
ADVERTISEMENT
