Maharashtra Corona Curfew: 15 दिवस कठोर निर्बंधांचे, वाचा उद्धव ठाकरेंच्या घोषणा

मुंबई तक

• 04:08 PM • 13 Apr 2021

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या रोज वाढतेच आहे. अशात आता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारपासून राज्यात कर्फ्यू जाहीर केला आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ वगळून संपूर्ण महाराष्ट्रात बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू होईल. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची निवडणूक 17 तारखेला होणार आहे ती झाल्यानंतर तिथेही संचारबंदीचे नियम असतील. या संचारबंदीमध्ये काय सुरू राहणार काय निर्बंध आहेत […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या रोज वाढतेच आहे. अशात आता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारपासून राज्यात कर्फ्यू जाहीर केला आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ वगळून संपूर्ण महाराष्ट्रात बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू होईल. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची निवडणूक 17 तारखेला होणार आहे ती झाल्यानंतर तिथेही संचारबंदीचे नियम असतील. या संचारबंदीमध्ये काय सुरू राहणार काय निर्बंध आहेत वाचा सविस्तर..

हे वाचलं का?

Break The Chain चे निर्बंध

पुढचे 15 दिवस अनावश्यक बाहेर फिरणं टाळा, विनाकारण घराबाहेर पडू नका

आवश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहणार

सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

लोकलसेवा, बससेवा या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू राहणार

जनावरांची रूग्णालयं सुरू राहणार आहेत

अधिस्वीकृती धारक पत्रकारांना प्रवासाची मुभा असणार आहे

हॉटेल्स, रेस्तराँ, ठेले यांची पार्सल सेवा सुरू असेल

गरीबांसाठी प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ दिला जाणार

7 कोटी लोकांना एक महिना मोफत धान्य

पुढचा महिनाभर दररोज 2 लाख याप्रमाणे शिवभोजन गरीबांना मोफत दिलं जाणार

वयोवृद्ध माणसं, महिला,आदिवासी, निराधार लोकांना 2 महिन्यांकरीता हजार रूपये दिले जाणार आहेत. एकूण ३५ लाख लोकांना हे पैसे दिले जाणार

अधिकृत फेरीवाल्यांना प्रति महिना 1500 रूपये दिले जाणार आहेत.

पाच लाख लाभार्थ्यांना होणार फायदा

नोंदणीकृत रिक्षाचालकांना 1500 रुपये दिले जाणार

आदिवासी कुटुंबांना सहाय्य

आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या सुमारे १२ लाख आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य येईल.

फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्य

राज्यातील सुमारे पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. ही रक्कम थेट फेऱीवाल्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

    follow whatsapp