Mumbai तल्या सेंट जोसेफ शाळेतील 22 मुलं Corona पॉझिटिव्ह

सौरभ वक्तानिया

• 06:29 PM • 26 Aug 2021

मुंबईतल्या सेंट जोसेफ शाळेती २२ मुलं कोरोना पॉझिटिव्ह झाली आहेत. सेंट जोसेफ बोर्डिंग स्कूलमधल्या 12 वर्षांखालील चार मुलांना नायर रूग्णालयातल्या बालरोग विभागात दाखल करण्यात आलं आहे. तर 11 मुलांना जे 12 ते 18 वयोगटातले आहेत. त्यांना रिचर्डसन क्रुडासमधल्ये कोव्हिड वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. मुंबईतल्या आग्रीपाडा भागात हे बोर्डिंग स्कूल आहे. देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना […]

Mumbaitak
follow google news

मुंबईतल्या सेंट जोसेफ शाळेती २२ मुलं कोरोना पॉझिटिव्ह झाली आहेत. सेंट जोसेफ बोर्डिंग स्कूलमधल्या 12 वर्षांखालील चार मुलांना नायर रूग्णालयातल्या बालरोग विभागात दाखल करण्यात आलं आहे. तर 11 मुलांना जे 12 ते 18 वयोगटातले आहेत. त्यांना रिचर्डसन क्रुडासमधल्ये कोव्हिड वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. मुंबईतल्या आग्रीपाडा भागात हे बोर्डिंग स्कूल आहे.

हे वाचलं का?

देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. एक संकट दूर होत असताना आता तिसर्‍या लाटेच्या धोक्याबाबतही शक्यता वर्तवली जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाची तिसरी लाट लवकरच भारतात दिसू शकते. यासह, काही तज्ञ आणि अभ्यासकांच्या मते, तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका होण्याची शक्यता आहे. या दरम्यान मुंबईतील आगरी पाड्यातील सेंट जोसेफ बोर्डिंग स्कूलमधील 22 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर परिणाम होणार हा इशारा खरा ठरणार का? असा सवाल उपस्थित आहे.

भारतात दोन आठवड्यात झायडस कॅडिलाच्या लसीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळू शकते. ही लस 12 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी 67 टक्क्यांपर्यंत परिणामकारक आहे. जायडस कॅडिलाची कोरोना लशीची 12 वर्षांहून अधिक वयाच्या मुलांवर चाचणी झाली आहे. आता लवकरच या लसीला डीसीजीआय परवानगी मिळण्याची आशा आहे. ही माहिती नीति आयोगाच्या आरोग्य सदस्य डॉ. पॉल यांनी दिली आहे.

झायडस कॅडिलाची कोरोना लस जायकोव डी (Zycov D) ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. कॅडिलानं कोरोना लसीसाठी सीडीएससीओ म्हणजेच, सेंट्रल ड्रग स्टँण्डर्ड कंट्रोल आर्गेनायजेशनकडे आपातकालीन वापरासाठी मंजुरी मागितली आहे. कंपनीनं जवळपास 28 हजार लोकांवर चाचणी पूर्ण केल्यानंतर इमरजेंसी युज ऑथरायजेशन म्हणजेच, आपातकालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे. कंपनीच्या अर्जावर सीडीएससीओकडून डाटा अॅनालिसिस केलं जात आहे. कंपनीच्या वतीनं वॅक्सिन ट्रायलचा सर्व डाटा देण्यात आला आहे. दरम्यान ही शाळा सील करण्यात आली आहे. तसंच खबरदारीचे उपाय योजण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

    follow whatsapp