नांदेड: धक्कादायक.. दोन पुरुष आणि एका महिलेचा मृतदेह सापडला संशयास्पद स्थितीत, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

• 02:47 PM • 06 Dec 2021

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील जंगलात तीन जणांचे मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडले असल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. मयत हिमायतनगर तालुक्यातील टेम्भी गावातील रहिवाशी असून हिमायतनगर रस्त्यावरील टाकराळा गावाच्या जवळ जे जंगल आहे तिथे या तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत. दरम्यान, पोलिसांनी याबाबत माहिती […]

Mumbaitak
follow google news

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील जंगलात तीन जणांचे मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडले असल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. मयत हिमायतनगर तालुक्यातील टेम्भी गावातील रहिवाशी असून हिमायतनगर रस्त्यावरील टाकराळा गावाच्या जवळ जे जंगल आहे तिथे या तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत.

हे वाचलं का?

दरम्यान, पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, तिघाही मृतांची ओळख पटविण्यात त्यांना यश आलं आहे. भोकरमधील तालुक्यातील टेंभी या गावातील हे तिघेही रहिवाशी आहेत. दरम्यान, जंगलात जे तीन मृतदेह आढळून आले त्यापैकी एका व्यक्तीचा मृतदेह हा जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ज्याचं नवा शांतामन कावळे (वय 46 वर्ष) आहे. तर त्याचाच शेजारीच त्याची पत्नी सीमा (वय 40 वर्ष) आणि मुलगा सुजीत कावळे (वय 17 वर्ष) यांचा मृतदेह आढळून आला आहे.

पोलिसांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, सीमा आणि सुजीत कावळे या दोघांची हत्या दगडाने ठेचून करण्यात आली आहे. तर शांतामन याचा मृतदेह मात्र झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे या दोघांची हत्या नेमकी कोणी केली आणि शांतामन याने गळफास घेतला की, त्याला देण्यात आला या सगळ्या प्रकाराचा आता पोलीस देखील सखोल तपास करत आहेत.

मात्र, या सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे याच कुटुंबातील दुसरा मुलगा अभिजीत हा मात्र, घटनेच्या दिवसापासून गायब आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून त्याचा शोध सुरु असून तो सापडल्यानंतरच या प्रकरणी नेमकं काय घडलं हे उजेडात येऊ शकेल.

मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीच कावळे कुटुंबीय हे मुंबईहून परतले होते. अनेक वर्ष ते मुंबईत राहून आपलं पोट भरत होते. पण लॉकडाऊन झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावी परतले होते. आणि तेव्हापासून ते गावातच राहत होते. पण गेल्या 5-6 दिवसापासून हे संपूर्ण कुटुंबीय गावात दिसलं नव्हतं. ज्यानंतर आज (6 डिसेंबर) अचानक त्यांच्या कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आले. तर एक जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, जेव्हा पोलिसांना तीन मृतदेह जंगलात सापडल्याची घटना समजली तेव्हा त्यांनी तात्काळ जंगलाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी हे तीनही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. पोलिसांच्या अंदाजानुसार, किमान पाच ते सहा दिवसांपूर्वीच या सगळ्यांचा मृत्यू झाला असावा. मात्र, याबाबत नेमकी माहिती ही शवविच्छेदनानंतरच समजू शकणार आहे. हे सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी ते शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत.

भावाने कोयत्याचे वार करत बहिणीचं शीर केलं धडावेगळं आणि ओरडला.. औरंगाबादच्या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला

या संपूर्ण प्रकरणाने भोकर तालुक्यात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. एकाच वेळी एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळल्याने या प्रकरणातील गूढ वाढलं आहे. त्यामुळे पोलिसांसमोर या प्रकरणाचा छडा लावण्याचं मोठं आव्हान आहे.

    follow whatsapp