चिंताजनक… Omicron मुळे महाराष्ट्राची चिंता वाढली, दिवसभरात सापडले 8 नवे रुग्ण!

मुंबई तक

• 05:14 PM • 18 Dec 2021

मुंबई: कोरोना आणि त्याचा नवीन व्हेरिएंट Omicron मुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंट रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ताज्या अपडेटनुसार, आज (18 डिसेंबर) दिवसभरात राज्यात ओमिक्रॉनचे आणखी 8 नवे रुग्ण सापडले आहेत. राज्यात सापडलेल्या 8 रुग्णांपैकी 4 रुग्ण हे मुंबई विमानतळ पर्यवेक्षण विभागातील, 3 सातारा आणि 1 रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: कोरोना आणि त्याचा नवीन व्हेरिएंट Omicron मुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंट रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ताज्या अपडेटनुसार, आज (18 डिसेंबर) दिवसभरात राज्यात ओमिक्रॉनचे आणखी 8 नवे रुग्ण सापडले आहेत.

हे वाचलं का?

राज्यात सापडलेल्या 8 रुग्णांपैकी 4 रुग्ण हे मुंबई विमानतळ पर्यवेक्षण विभागातील, 3 सातारा आणि 1 रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहे. यासह राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 48 वर पोहोचली आहे. तथापि, यापैकी 28 रुग्णांना आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजपर्यंत राज्यात एकूण 48 ओमिक्रॉन रुग्ण सापडले आहेत. (मुंबई-18, पिंपरी-चिंचवड- 10, पुणे ग्रामीण- 6, पुणे मनपा- 3, सातारा- 3, कल्याण-डोंबिवली – 2, उस्मानाबाद – 2, बुलढाणा – 1, नागपूर – 1, लातूर – 1, वसई-विरार -1)

परिस्थिती पाहता अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी ओमिक्रॉनचा संसर्ग अधिक पसरु नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने आगामी 25 डिसेंबर म्हणजेच ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनबाबत कठोर काही विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

  • बंद हॉलमधील कोणत्याही कार्यक्रमासाठी हॉल क्षमतेच्या केवळ 50 टक्के लोकांनाच सहभागी होण्याची परवानगी असेल. त्याच वेळी, एकूण क्षमतेच्या केवळ 25 टक्के खुल्या ठिकाणी सहभागी होण्याची परवानगी असेल.

  • कोणत्याही कार्यक्रमासाठी एक हजाराहून अधिक लोक एकत्र जमायचे असल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

  • सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, सिनेमा हॉल, मॉल्स आणि इतर सर्व सरकारी आणि खाजगी आस्थापनांना हजेरीबाबत नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 854 नवीन रूग्णांचं निदान, ओमिक्रॉनचे तब्बल 8 नवे रुग्ण

  • सर्व नागरिकांना कोव्हिड-19 लसीच्या दोन्ही डोससह लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतुकीसह सार्वजनिक ठिकाणी ज्या लोकांनी लसींचे दोन्ही डोस घेतल्या आहेत त्यांनाच परवानगी दिली जाईल. या नियमाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल.

  • सार्वजनिक ठिकाणी/संस्थांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी तसेच कोणत्याही कार्यात उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संस्थेवर ती कारवाई करण्यात येईल.

  • मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टंसिंग, सर्व परिसर/खोल्या/शौचालयांची नियमित स्वच्छता आणि स्वच्छता अनिवार्य आहे.

    follow whatsapp