PM Modi: 'तेव्हा उद्धव ठाकरेंना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेन..', मोदींच मोठं विधान

मुंबई तक

03 May 2024 (अपडेटेड: 03 May 2024, 12:16 AM)

PM Modi on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत. जर उद्या ते अडचणीत आले तर मी पहिला व्यक्ती असेन की, मी त्यांची मदत करेन. असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

'उद्धव ठाकरेंना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेन..'

'उद्धव ठाकरेंना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेन..'

follow google news

Maharashtra Lok Sabha Election 2024 PM Modi and Uddhav Thackeray: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 च्या प्रचारात शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदी आणि भाजपवर तुफान टीका करत आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी देखील ठाकरेंवर टीकेची झोड उठवत आहेत. मात्र, असं असलं तरी मोदींनी टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एक मोठं विधान केलं आहे. (lok sabha election 2024 if uddhav thackeray gets into trouble in future i will be the first person to help him pm modi big statement)

हे वाचलं का?

'बाळासाहेबांचे पुत्र म्हणून मी त्यांचा मानसन्मान करेनच.. ते माझे शत्रू नाहीत. जर उद्या ते अडचणीत आले तर मी पहिला व्यक्ती असेन की, मी त्यांची मदत करेन.' असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलाखतीत केलं आहे. 

पाहा उद्धव ठाकरेंबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी 

प्रश्न: तुम्ही उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे उत्तराधिकारी मानतात की नाही?

पंतप्रधान मोदी: दोन गोष्टी आहेत.. ते बायोलॉजिकली त्यांचे पुत्र आहेतच.. त्याबाबत काही विषयच नाही.. जेव्हा उद्धव ठाकरे आजारी होते मी त्यांना तात्काळ फोन केला होता. मी नेहमी वहिनींना (रश्मी ठाकरे) करून उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचो. 

हे ही वाचा>> 'यासाठी' शिंदेंना बनवलं CM, मोदींनी सांगितलं खरं कारण!

ऑपरेशन करण्याआधी मला फोन केला... मला विचारलं की, तुमचा सल्ला काय? मी म्हटलं की, 'तुम्ही सर्वात आधी ऑपरेशन करून घ्या.. बाकीच्या चिंता सोडून द्या.. शरीराची काळजी घ्या. 

बाळासाहेबांचे पुत्र म्हणून मी त्यांचा मानसन्मान करेनच.. ते माझे शत्रू नाहीत. जर उद्या ते अडचणीत आले तर मी पहिला व्यक्ती असेन की, मी त्यांची मदत करेन. कौटुंबिकदृष्ट्या म्हणतोय मी.. 

पण जिथवर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा मुद्दा आहे तर मी त्यासाठीच जगेन.. बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज विसरू शकत नाही.. अजिबात विसरू शकत नाही. 

आज जे आम्ही शिवसेनेसोबत बसलो आहोत.. आमच्याकडे आज सर्वात जास्त आमदार आहेत पण तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे.. ही माझी बाळासाहेबांना श्रद्धांजली आहे.. 

हे ही वाचा>> पवार या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्र काय..: मोदी

आम्ही मागील निवडणुकीत (2014 साली) आमनेसामने लढलो होतो. पण त्या निवडणुकीत मी एक शब्दही बाळासाहेबांच्या विरुद्ध बोललो नव्हतो. मी जाहीररित्या बोललो होतो की, मला उद्धवजी कितीही शिव्या देवोत.. पण नाही बोलणार, कारण माझं बाळासाहेबांवर माझी श्रद्धा आहे. म्हणून त्यांच्या कौटुंबिक काय अडचणी आहेत हा माझा विषय नाही.. 

मी बाळासाहेबांचा आदर करतो आणि मी त्यांचा आयुष्यभर आदर करत राहो.. असं उत्तर पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिलं. 

म्हणजेच पंतप्रधान मोदींनी यावेळी असं सांगण्याचा प्रयत्न केला की, कौटुंबिक पातळीवर आपले उद्धव ठाकरेंशी संबंध हे चांगले आहेत. मात्र, वैचारिक मतभेद आहेत. 

आता पंतप्रधान मोदींच्या या दाव्यावर उद्धव ठाकरे नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp