महिलेच्या रेस्टॉरंटबाहेर तरुणांचे अश्लील चाळे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नको ते झालं कैद

crime news : एका महिला उद्योजकाच्या रेस्टॉरंटबाहेर काही तरुणांनी अश्लील कृत्य केले. नोएडातली पॉश परिसरतील सेक्टर 18 मार्केटमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 09:33 AM • 06 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलेच्या रेस्टॉरंटबाहेर तरुणांचं नको तेच कृत्य 

point

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कृत्याची मालिका कैद

Crime News : एका महिला उद्योजकाच्या रेस्टॉरंटबाहेर काही तरुणांनी अश्लील कृत्य केले. नोएडातली पॉश परिसरतील सेक्टर 18 मार्केटमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीचा तपास सुरु केला होता. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणामागील गूढ! अजितदादांना नेमकं काय हवं होतं?

महिलेच्या रेस्टॉरंटबाहेर तरुणांचं नको तेच कृत्य 

नोएडातील वर्दळ असलेल्या ठिकाणी महागड्या बाजारपेठा असलेल्या सेक्टर 18 मधील एका महिला उद्योजगाच्या रेस्टॉरंटबाहेर ही घटना घडली. काही दिवसांपासून काही तरुण रात्री उशिरा रेस्टॉरंटबाहेर लघवी करायचे आणि विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचे, असा पीडितेनं आरोप केला आहे. 

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कृत्याची मालिका कैद

रेस्टॉरंटमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये तरुणांच्या कृत्याची मालिका कैद झाली. 29 जानेवारी रोजी पहाटे 3:45 वाजता, कर्मचाऱ्यांनी विरोध केला असता, तरुणांमध्ये मोठा वाद उफळला. 31 जानेवारी रोजी पहाटे 3:30 वाजता, तेच तरुण पुन्हा नको तेच कृत्य करू लागले. 

हे ही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणामागील गूढ! अजितदादांना नेमकं काय हवं होतं?

रेस्टॉरंट मालकाचे म्हणणे असं की, दररोज रात्री 2.00 ते 3.30 वाजता तीन ते चार तरुण कारमधून येतात, रेस्टॉरंटच्या पायऱ्यांवर कचरा टाकतात आणि पळून जातात. रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्यांच्या अहंकाराने त्यांना धमकावले. व्यथित झालेल्या महिलेनं सेक्टर 20 पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. संबंधित प्रकरणात तरुणांची ओळख पटवत लवकरच आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.  

    follow whatsapp