प्रियकराला इशारा केला अन्..; नवविवाहितेने नवऱ्याला कसं संपवलं?

Crime News : राजस्थानच्या श्रीगंगानगर परिसरातून एका तरुणाच्या निर्घृण हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. तीन महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. 31 जानेवारी 2026 रोजी त्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. सुरुवातीला पोलिसांनी याला अपघात मानून तपास सुरु केला, मात्र पोस्टमार्टम अहवालात त्याच्या शरीरावर आढळलेल्या जखमांवरुन त्याचा खून झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 04:10 PM • 05 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकराला इशारा केला अन्..

point

नवविवाहितेने नवऱ्याला कसं संपवलं?

Crime News : राजस्थानच्या श्रीगंगानगर परिसरातून एका तरुणाच्या निर्घृण हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. तीन महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. 31 जानेवारी 2026 रोजी त्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. सुरुवातीला पोलिसांनी याला अपघात मानून तपास सुरु केला, मात्र पोस्टमार्टम अहवालात त्याच्या शरीरावर आढळलेल्या जखमांवरुन त्याचा खून झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. आशिष असे मृत तरुणाचे नाव आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : नांदेड : फुल्ल दारु पिला, नादात अंगावर पेट्रोल ओतून घेतलं, अन् सलमानने स्वत:ला पेटवलं; उपचारादरम्यान मृत्यू

अंजलीला प्रियकरासोबत रहायचे होते

पोलीस तपासात समोर आले की, ही हत्या आशिषची पत्नी अंजली हिनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने घडवून आणली होती. अंजलीचे लग्नापूर्वी संजय नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते आणि लग्नानंतरही ती त्याच्या संपर्कात होती. ती या लग्नामुळे आनंदी नव्हती आणि तिला तिच्या प्रियकरासोबत राहायचे होते. याच कारणातून तिने आशिषला संपवण्याचा कट रचला. तांत्रिक तपास आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांना अंजली आणि संजयमधील संवादाचे पुरावे मिळाले.

अंजलीने इशारा केला आणि...

घटनेच्या रात्री अंजलीने आशिषला फिरण्याच्या बहाण्याने घराबाहेर एका निर्जन रस्त्यावर नेले, जिथे तिचा प्रियकर संजय आणि त्याचे दोन साथीदार आधीच लपून बसले होते. अंजलीने इशारा करताच आरोपींनी आशिषवर दांडक्यांनी जोरदार हल्ला केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी होऊन खाली पडला. त्यानंतर आरोपींनी मफलरने त्याचा गळा आवळून त्याला जागीच ठार केले. हत्येनंतर हा प्रकार अपघात आणि लूट वाटावा यासाठी अंजलीने स्वतःचे दागिने आणि आशिषचा मोबाईल आरोपींना देऊन टाकले, जेणेकरुन पोलिसांची दिशाभूल करता येईल.

हे ही वाचा : आईने 13 वर्षाच्या मुलीचा विवाह 55 वर्षीय वृद्धाशी लावून दिला, नंतर स्वत: प्रियकरासोबत गेली पळून...

पोलिसांनी काय माहिती दिली?

पोलीस अधीक्षक डॉ. अमृता दुहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मृताची पत्नी अंजली, तिचा प्रियकर संजय, रोहित आणि बादल या चौघांना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळावर मिळालेले पुरावे आणि कॉल रेकॉर्ड्समुळे या आरोपींचा सहभाग स्पष्ट झाला आहे. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत असून, हा कट कधीपासून रचला जात होता आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेत आहेत. आरोपींना न्यायालयात हजर करुन पोलीस कोठडी घेतली जाणार आहे.

    follow whatsapp