बायकोच्या पोटात 2 महिन्यांचा वाढत होता गर्भ, पीडितेनं हुंडा न दिल्याने नराधम्यांनी पोटात घातल्या लाथा

मुंबई तक

04 Feb 2026 (अपडेटेड: 04 Feb 2026, 07:48 PM)

crime news : नवऱ्याने आपल्या प्रेग्नंट महिलेला हुंडा न दिल्याच्या रागातून बेदम मारहाण केली. या मारहाणीत पीडित बायकोच्या पोटातील बाळाचा गर्भपात झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संबंधित प्रकरणात मध्यस्ती करण्यासाठी आलेल्या पीडितेच्या मेहुण्याला देखील बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नवऱ्यासह मेहुणा आणि शिवानीने महिलेला केली हुंड्याची मागणी 

point

आरोपींनी गर्भवती पीडितेच्या पोटावर लाथा मारल्या

Crime News : नवऱ्याने आपल्या प्रेग्नंट महिलेला हुंडा न दिल्याच्या रागातून बेदम मारहाण केली. या मारहाणीत पीडित बायकोच्या पोटातील बाळाचा गर्भपात झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संबंधित प्रकरणात मध्यस्ती करण्यासाठी आलेल्या पीडितेच्या मेहुण्याला देखील बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली. ही घटना हरयाणातील चंदीगडच्या लुधियानातील बस्ती जोडेवाल येथील बँक कॉलनी परिसरात घडली.

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुणे : कौटुंबिक वादातून नवऱ्याने बायकोची केली निर्घृण हत्या, नातेवाईकांकडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

नवऱ्यासह मेहुणा आणि शिवानीने महिलेला केली हुंड्याची मागणी 

संबंधित प्रकरणाची बँक कॉलनीतील रहिवासी असलेल्या पीडित अंजलीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तिचा विवाह हा 2 जून 2025 रोजी टिंकू तुल्ला नावाच्या तरुणाशी झाला होता. विवाहानंतर टिंकू, मेहुणा राजेश कुमार आणि मेहुणी पिंकी आणि शिवानी यांनी हुंड्याची मागणी केली होती. नंतर तिला बेदम मारहाण करून तिला घराबाहेर हाकलवून देण्यात आले असा आरोप करण्यात आला. 

आरोपींनी गर्भवती पीडितेच्या पोटावर लाथा मारल्या

अंजनीच्या म्हणण्यांनुसार, 23 जानेवारी रोजी तिची आई देवकी देवी आणि मेहुणे विजय दुग्गल तिला तिच्या सासरच्या घरी सोडवण्यासाठी आले होते. नंतर पु्न्हा त्या आरोपींनी पीडितेला बेदम मारहाण केली. अंजलीच्या म्हणण्यांनुसार, 23 जानेवारी तिची आई देवकी देवी आणि मेहुणा विजय दु्ग्गल पीडितेला सासरी सोडण्यासाठी आले होते. नंतर आरोपींनी गर्भवती पीडितेच्या पोटावर लाथा मारल्या. या हल्ल्यानंतर पीडितेची प्रकृती बिकट झाली असता तिचा गर्भपात झाला. 

हे ही वाचा : द्धव ठाकरेंच्या आमदारासाठी एकनाथ शिंदेंनी घेतली प्रचार सभा, राज्यात मोठ्या घडामोडी; नेमकं काय घडलं?

या दुर्दैवी घटनेनंतर पीडित अंजलीला सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अंजलीने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा पती टिंकू, मेहुणा राकेश कुमार, मेहुणी पिंकी आणि शिवानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.