धुळ्यातील नऊ भाविकांचा राजस्थानमध्ये अपघाती मृत्यू; खाटू श्यामचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला

सुमित भुजबळ

22 Nov 2026 (अपडेटेड: 22 Nov 2026, 01:43 PM)

Dhule News : राजस्थानमधील कोटा महामार्गावर उभ्या ट्रकला क्रुझरची धडक बसून धुळ्यातील नऊ भाविकांचा मृत्यू झाला. सहा जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Dhule News

Dhule News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

धुळ्यातील नऊ भाविकांचा राजस्थानमध्ये अपघाती मृत्यू;

point

खाटू श्यामचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला

Dhule News : धुळे जिल्ह्यातील भाविकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून राजस्थानमध्ये झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. खाटू श्याम देवाचे दर्शन घेऊन परतताना त्यांच्या क्रुझर गाडीला अपघात झाला. राजस्थानमधील कोटा महामार्गावर मध्यरात्री हा अपघात घडला. महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून क्रुझर गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीतील नऊ भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने धुळे जिल्ह्यात शोक व्यक्त केला जात आहे. 

हे वाचलं का?
Crime News

null

video icon

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगरमधील नराधमाला दुबईतून अटक, लैगिंक शोषण अन् 19.73 लाखांची लूट

या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये सजन दौलत पवार, उषाबाई सजन पवार, माधवी गणेश पवार, साऊ गणेश पवार, कैलास भगवान पवार, अनिता कैलास पवार, जानवी कैलास पवार, बाबूलाल दौलत पवार आणि सुशिलाबाई बाबुलाल पवार यांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले

या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये मनीषा शरद पवार, मयुरी शरद पवार, जगदीश कैलास पवार, श्रीजीत गणेश पवार, शरद बाबूलाल पवार आणि गणेश सय्यद पवार यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच कोटा येथील स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातात मृत्यू झालेले आणि जखमी झालेले सर्वजण धुळे जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेची माहिती धुळ्यातील कुटुंबीयांपर्यंत पोहोचली आहे.

हेही वाचा : Solapur Drought : 300 फूट खोल भीमा सीना बोगद्यात काय आहे? शेतकऱ्यांचा संघर्ष तुम्हीच पाहा..

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी धुळे जिल्ह्यातील तीन कुटुंबे तीन वेगवेगळ्या क्रुझर वाहनांमधून देवदर्शनासाठी निघाली होती. या सर्वांनी खाटू श्याम देवाचे दर्शन घेतले होते. दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू असताना एका क्रुझर वाहनाला राजस्थानमधील कोटा महामार्गावर अपघात झाला. महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला या क्रुझरने मागून धडक दिली आणि त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. देवदर्शनासाठी एकत्र गेलेल्या कुटुंबावर परतीच्या प्रवासातच दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेची माहिती धुळ्यात समजताच मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जिल्ह्यात शोक व्यक्त केला जात आहे.