रेल्वेत सापडला महिलेचा कुजलेला मृतदेह, भिकाऱ्याने बलात्कार करुन केली होती हत्या

पृथ्वीराज पाटील

22 Nov 2026 (अपडेटेड: 22 Nov 2026, 12:52 PM)

तामिळनाडूमध्ये रेल्वेत एका भिकाऱ्याने महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

रेल्वेत सापडला महिलेचा मृतदेह

point

भिकाऱ्याला अटक

point

नेमकं काय घडलं?

Crime News : एका ट्रेनमध्ये अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप एका भिकाऱ्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी 31 वर्षीय जे. अय्यप्पन याला अटक केली आहे. 18 नोव्हेंबर रोजी ट्रेनच्या दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यात हा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे, ही ट्रेन 11 नोव्हेंबरपासून दुरुस्तीच्या कामासाठी यार्डमध्ये उभी होती. डब्याची स्वच्छता सुरू असताना कर्मचाऱ्यांना मृतदेह दिसल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तामिळनाडूतील नागरकोइल जंक्शन रेल्वे स्थानकाच्या यार्डमधील रेल्वेत ही घटना घडली.

हे वाचलं का?
Crime News

null

video icon

अंगठीवरुन सापडला महिलेचा पत्ता

मृतदेह आढळल्यानंतर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, 14 नोव्हेंबर रोजी पांढरी धोती आणि शर्ट घातलेला एक व्यक्ती दिव्यांग डब्यातून खाली उतरताना दिसला. दरम्यान, मृत महिलेच्या बोटातील सापाची आकृती असलेल्या सोन्याच्या अंगठीमुळे पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला. अंगठीवरील हॉलमार्कच्या आधारे तपास केला असता, ती गुजरातमधून विक्रीसाठी पाठवण्यात आल्याचे समोर आले. पुढे ही अंगठी छत्तीसगडमधील रायपूर येथील एका विक्रेत्याला विकल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी महिलेची ओळख पटवण्यासाठी पॅन कार्ड आणि मध्य प्रदेशातील पत्त्याचा आधार घेतला.

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगरमधील नराधमाला दुबईतून अटक, लैगिंक शोषण अन् 19.73 लाखांची लूट

प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर काय घडलं?

पोलिसांच्या तपासानुसार, 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपी अय्यप्पन याने प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर फिरणाऱ्या महिलेला जबरदस्तीने ओढून रिकाम्या दिव्यांग डब्यात नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून बेदम मारहाण केली. तसेच छातीवर लाथा मारल्याने आणि गंभीर दुखापतींमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपी मृतदेह डब्यातच सोडून पळून गेला. पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी (20 नोव्हेंबर) अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीने रक्ताने माखलेला शर्ट एका खड्ड्यात फेकून दिला होता. पोलिसांनी तो शर्टही जप्त केला आहे. प्राथमिक तपासात महिलेच्या बरगड्या तुटल्याचे संकेत मिळाले आहेत.

हे ही वाचा : राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन, मराठवाड्यावर शोककळा

मूळ गावातून झआली होती बेपत्ता

दरम्यान, मृत महिला गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या मूळ गावातून बेपत्ता होती. तिचे पती आणि मुले मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी कन्याकुमारीच्या दिशेने येत असल्याची माहिती आहे. आरोपीची यापूर्वीही या महिलेशी काही वेळा भेट झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.