सात-आठ वर्षांपासून मैत्री आणि प्रेमसंबंध, ब्रेकअपच्या रागातून प्रेयसीचे घरच पेटवलं

मिथिलेश गुप्ता

• 09:05 PM • 21 Nov 2026

Dombivali Crime News : नाते संपवण्याच्या निर्णयावरून चिडलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या घराला आग लावल्याचा प्रकार डोंबिवलीमध्ये समोर आला आहे. या आगीत सुदैवाने तरुणी आणि तिचे आई-वडील सुरक्षित राहिले असून मोठा धोका टळला. या घटनेनंतर मानपाडा पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली.

Dombivali Crime News

Dombivali Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सात-आठ वर्षांपासून मैत्री आणि प्रेमसंबंध

point

आरोपी दीपेश रस्तोग अटकेत

Dombivali Crime News : नाते संपवण्याच्या निर्णयावरून चिडलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या घराला आग लावल्याचा प्रकार डोंबिवलीमध्ये समोर आला आहे. या आगीत सुदैवाने तरुणी आणि तिचे आई-वडील सुरक्षित राहिले असून मोठा धोका टळला. या घटनेनंतर मानपाडा पोलिसांनी कारवाई करत आरोपी दीपेश रस्तोगी याला ताब्यात घेतले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : सातारा : अल्टो कारचा अपघात! डिव्हायडरला धडकून तीन पलट्या; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

सात-आठ वर्षांपासून मैत्री आणि प्रेमसंबंध

पोलिसांच्या माहितीनुसार, डोंबिवलीतील एका उच्चभ्रू वस्तीत राहणारी तरुणी आणि दीपेश रस्तोगी यांच्यात गेल्या सात-आठ वर्षांपासून मैत्री आणि प्रेमसंबंध होते. मात्र, अलीकडच्या काळात दोघांमध्ये वाद व मतभेद वाढू लागले होते. त्यामुळे हे नाते पुढे न्यायचे नाही, असा निर्णय तरुणीने घेतला आणि तिने दीपेशला थेट सांगून टाकले.

या नकारामुळे दीपेश प्रचंड संतप्त झाला. या रागातून त्याने कथितरीत्या प्रेयसीच्या घरावर आग लावल्याचे सांगितले जात आहे. घरामध्ये आग लागल्याचे लक्षात येताच कुटुंबात घबराट उडाली; मात्र तरुणी आणि तिच्या आई-वडिलांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही.

हे ही वाचा : लेकानं वडिलांच्या अपमानाचा घेतला बदला, निर्जनस्थळी 20 वेळा दगडाने ठेचलं

आरोपी दीपेश रस्तोग अटकेत

घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तातडीने पावले उचलत तपास सुरू केला आणि आरोपी दीपेश रस्तोगी याला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास मानपाडा पोलीस करत आहेत.