आधी तरुणीला 10 व्या मजल्यावरुन फेकलं, आता तुरुंगातील बाथरुममध्ये आरोपीचा मृतदेह सापडला

सुमित भुजबळ

• 07:22 AM • 21 Nov 2026

Crime News : लखनौमधील समरीन मृत्यू प्रकरणातील आरोपी अवनीश जायसवाल याने तुरुंगातील बाथरूममध्ये टॉवेलच्या साहाय्याने फास घेऊन आत्महत्या केली. हॉटेलच्या दहाव्या मजल्यावरून पडून समरीनचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

आधी तरुणीला 10 व्या मजल्यावरुन फेकलं

point

आता तुरुंगातील बाथरुममध्ये आरोपीचा मृतदेह सापडला

Crime News : लखनौमधील 24 वर्षीय समरीनच्या मृत्यू प्रकरणातील आरोपी अवनीश जयस्वाल याने तुरुंगात आत्महत्या केली. गुरुवारी तुरुंगातील बाथरूममध्ये टॉवेलच्या साहाय्याने तयार केलेल्या फासाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच तुरुंगाधिकारी ऋत्विक प्रियदर्शी आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

अवनीश जयस्वाल उर्फ देव याच्यावर लखनौमधील सुशांत गोल्फ सिटी परिसरातील हॉटेलच्या दहाव्या मजल्यावरून पडून समरीनचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोप होता. या घटनेनंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला होता. त्यानंतर या प्रकरणात त्याच्यावर आरोप करण्यात आले होते.

हेही वाचा : शिंदेंच्या शिवसेनेचं सकाळी आंदोलन, संध्याकाळी काँग्रेससोबत सत्ता... शिंदेंच्या राजकारणाने भाजपही चक्रावलं!

दहाव्या मजल्यावरून पडल्याने समरीनचा मृत्यू

समरीन मृत्यू प्रकरण लखनौमधील सुशांत गोल्फ सिटी परिसरातील ओमेक्स न्यू हजरतगंज येथील हॉटेल सेलेस्टियलमधील आहे. या हॉटेलच्या दहाव्या मजल्यावरून पडल्याने 24 वर्षीय समरीनचा मृत्यू झाला होता. चौक परिसरात राहणारी समरीन ही सुलतानपूर येथील रहिवासी असलेल्या अवनीश जायसवालसोबत हॉटेलमध्ये गेली होती. दोघेही हॉटेलमधील 1037 क्रमांकाच्या खोलीत थांबले होते. सायंकाळी साधारण सहा वाजण्याच्या सुमारास समरीन बाल्कनीतून खाली पडली. या घटनेत तिचा मृत्यू झाला. मात्र, समरीन खाली पडल्यानंतर अवनीश घटनास्थळावरून फरार झाला होता. या घटनेनंतर अवनीशवर समरीनच्या मृत्यूप्रकरणी आरोप करण्यात आले होते. त्याला तुरुंगात ठेवण्यात आले होते.

हेही वाचा : शिवसेना सुनावणी : शिंदेंच्या वकिलांचा शेवटचा डाव, ठाकरेंच्या वकिलांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न; काय घडलं?

तुरुंगातील बाथरूममध्ये मृतदेह आढळला

दरम्यान, गुरुवारी तुरुंग परिसरात अवनीश जयस्वाल याचा मृतदेह बाथरूममध्ये आढळल्याने खळबळ उडाली. त्याने टॉवेलच्या साहाय्याने फास तयार करून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच तुरुंगाधिकारी ऋत्विक प्रियदर्शी आणि पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. समरीनच्या मृत्यू प्रकरणातील आरोपीच तुरुंगात मृतावस्थेत आढळल्याने या घटनेची माहिती समोर आली आहे. तुरुंगातील बाथरूममध्ये त्याचा मृतदेह आढळल्यानंतर पोलीस आणि तुरुंग प्रशासनाकडून पुढील तपास केला जात आहे.

समरीनच्या कुटुंबात पाच बहिणी आणि दोन भाऊ आहेत. तिचे दोन्ही भाऊ परदेशात जरदोझीचे काम करतात, तर तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. समरीन ही आई आणि बहिणींसोबत राहत होती. धाकटी बहीण हबीबा हिच्यासाठी कपडे खरेदी करण्याचे कारण सांगून ती घरातून बाहेर पडली होती. समरीनच्या वैवाहिक आयुष्यातही तणाव होता. तिचा पतीसोबत वाद सुरू होता आणि त्यासंदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. अशा परिस्थितीत समरीनचा हॉटेलच्या दहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणात अवनीश जायसवाल याच्यावर आरोप करण्यात आले होते. मात्र, आता त्याने तुरुंगात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्याच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर तुरुंगाधिकारी आणि पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.