Crime News : बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एका 39 वर्षीय विवाहित महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर विष देऊन हत्या केल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या माहेरच्या नातेवाईकांनी महिलेच्या सासरच्या घराच्या दारातच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे. विभा असे मृत महिलेचे नाव असून, तिचा विवाह नोव्हेंबर 2014 मध्ये चंदन ठाकूर याच्याशी झाला होता. विभाच्या मृत्यूनंतर तिचे वडील बच्चू चौधरी यांनी पती चंदन ठाकूर आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : रोहित पवारांचे थेट फडणवीसांवर आरोप.., सुप्रिया सुळे प्रतिक्रिया देताना काय म्हणाल्या?
विभाला सासरच्या मंडळींकडून त्रास झाल्याचा आरोप
बच्चू चौधरी यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, लग्न झाल्यापासूनच विभाला सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात होता. विभा आणि तिच्या पतीमध्ये वैवाहिक वाद होते. या वादातून मुझफ्फरपूर आणि अहमदाबाद या दोन्ही ठिकाणी न्यायालयीन प्रकरणेही सुरू होती. विभाचे माहेरचे कुटुंब अहमदाबाद येथे राहते. लग्नानंतर सातत्याने त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर विभाचा मृत्यू संशयास्पद असल्याचे तिच्या माहेरच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यांनी या प्रकरणात पतीसह सासरच्या इतर सदस्यांवरही गंभीर आरोप केले आहेत.
हेही वाचा : वेदर रिपोर्ट : चक्रीवादळ अक्वान धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार ?
मुलीची हत्या झाल्याचा आरोप
चौधरी यांच्या तक्रारीनुसार, 15 नोव्हेंबर रोजी विभाला विष मिसळलेले अन्न देण्यात आले होते. त्यानंतर तिची प्रकृती अचानक बिघडली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना 16 नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. विभाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर तिचे माहेरचे नातेवाईक अहमदाबादहून मुझफ्फरपूर येथे पोहोचले. आपल्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप करत त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर विभाच्या सासरच्या घराच्या दारातच तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. सासरच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
विभाच्या मृत्यूच्या प्रकरणात तिचा पती चंदन ठाकूर, त्याचे आई-वडील, बहीण आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा सहभाग असल्याचा आरोप बच्चू चौधरी यांनी केला आहे. या सर्वांनी मिळून कट रचल्याचा दावा त्यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. दरम्यान, विभाच्या मृत्यूनंतर चंदन ठाकूर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य फरार असल्याचे सांगण्यात आले आहे. या दाम्पत्याला 12 वर्षांची एक मुलगी असून, ती सध्या अहमदाबाद येथे आपल्या आजोबांसोबत राहते. विभाच्या मृत्यूनंतर तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप आणि सासरच्या घरासमोर केलेले अंत्यसंस्कार यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे.
ADVERTISEMENT












