PWD मध्ये नोकरीचं अमिष; तरुणीवर आठ वर्षांपासून सामूहिक बलात्कार, 'या' खासदाराचा पीए फरार

Crime News : PWD विभागात नोकरी मिळवून देण्याच्या अमिषाने एका मुलीवर 6 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये एका खासदाराच्या पीएचा सहभाग असल्याची चर्चा आहे. गेल्या आठ वर्षांपासून पीडितेसोबत हा प्रकार सुरु होता. वयाच्या 14 व्या वर्षांपासून तिच्यासोबत हा प्रकार सुरु झाला. या प्रकरणी तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, तर तिघं अजूनही फरार आहेत. छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील ही घटना आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

05 Feb 2026 (अपडेटेड: 05 Feb 2026, 09:00 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

PWD मध्ये नोकरीचं अमिष

point

तरुणीवर आठ वर्षांपासून सामूहिक बलात्कार

Crime News : PWD विभागात नोकरी मिळवून देण्याच्या अमिषाने एका मुलीवर 6 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये एका खासदाराच्या पीएचा सहभाग असल्याची चर्चा आहे. गेल्या आठ वर्षांपासून पीडितेसोबत हा प्रकार सुरु होता. वयाच्या 14 व्या वर्षांपासून तिच्यासोबत हा प्रकार सुरु झाला. या प्रकरणी तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, तर तिघं अजूनही फरार आहेत. छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : आजीचा नीट उपचार केला नाही; नातवाने दवाखान्यातच डॉक्टरला संपवलं अन् पोलिसांकडे जाऊन... पुढं काय घडलं?

नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक

पीडितेने 30 जानेवारी 2026 रोजी दुर्गच्या महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. तिने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, हा प्रकार एप्रिल 2018 मध्ये सुरू झाला होता आणि ऑक्टोबर 2025 पर्यंत चालला. PWD मध्ये टाइमकीपर पदावर असलेल्या कृपा शंकर कश्यप उर्फ राजूने पीडितेला डेली वेजमध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून पहिल्यांदा बलात्कार केला. यानंतर आरोपीने अश्लील व्हिडीओ बनवला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन सतत शोषण केले. मुख्य आरोपीने आपल्या मित्रांसोबत मिळून वेगवेगळ्या रेस्ट हाऊस आणि ठिकाणांवर पीडितेसोबत सामूहिक बलात्कार केला. विरोध केल्यावर पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

राजकीय लागेबांधे असल्याचा आरोप

या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून तीन आरोपी फरार आहेत.  फरार आरोपींचे हाय-प्रोफाइल संबंध असल्याची चर्चा आहे. फरार आरोपींपैकी एक असलेला बी. एन. पांडेय याने आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलवर स्वतःला दुर्गचे खासदार विजय बघेल आणि छत्तीसगचे माजी मंत्री दिवंगत हेमचंद्र यादव यांचा पीए असल्याचं लिहिलं आहे. स्थानिक लोकांचा आरोप आहे की, त्याच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे पीडितेला दीर्घकाळ भीतीखाली राहावे लागले आणि ती तक्रार नोंदवू शकली नाही. अशीही चर्चा आहे की, या आरोपींची एक संघटित टोळी आहे जी कंत्राटांमध्ये हस्तक्षेप करते आणि अवैध कमाई व्याजावर देण्याचे काम करते.  फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिस छापेमारी करत आहेत.

हे ही वाचा : पत्नीसोबत अनैसर्गिक संभोग करायचा पती, 'या' गोष्टीसाठी द्यायचा भयंकर त्रास.. बीडमधील धक्कादायक घटना

3 अटक, 3 फरार

पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी विजय स्वाइन, अनिल चौधरी, गोविंद सिंह नागवंशी, कृपा शंकर कश्यप उर्फ राजू (PWD टाइमकीपर आणि भिलाईच्या सेक्टर-5 मंदिराचा संरक्षक), बी. एन. पांडेय ( स्वतःला खासदाराचा PA सांगणारा) आणि संजय पंडित हे आहेत.