जेलरंने गळफास घेत संपवलं जीवन, एका महिन्यावर लग्न येऊन ठेपलं होतं..

मुंबई तक

05 Feb 2026 (अपडेटेड: 06 Feb 2026, 12:44 AM)

Crime News : नैनी मध्यमवर्ती कारागृहात तैनात असलेल्या एका 28 वर्षीय तुरुंग रक्षाकाने गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी रात्री हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्या केलेल्या तुरुंग रक्षकाचे नाव पृथ्वीराज चौहान असे नाव आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पृथ्वीराज फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला

point

काही महिन्यांपूर्वी तरुणाचे लग्न ठरले होते 

Crime News : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नैनी मध्यमवर्ती कारागृहात तैनात असलेल्या एका 28 वर्षीय तुरुंग रक्षाकाने गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी रात्री हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्या केलेल्या तुरुंग रक्षकाचे नाव पृथ्वीराज चौहान असे नाव आहे. ते नैनाीच्या प्रयागराज कॉलनीत एकटे राहत होते. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : आईने 13 वर्षाच्या मुलीचा विवाह 55 वर्षीय वृद्धाशी लावून दिला, नंतर स्वत: प्रियकरासोबत गेली पळून...

पृथ्वीराज फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला

रविवारी रात्री पृथ्वीराज त्याच्या शिफ्टसाठी हजर न राहिल्याने अचानकपणे ही माहिती समोर आली. तुरुंग प्रशासनाकडून वारंवार फोन करूनही प्रत्युत्तर न दिल्याने तुरुंग रक्षकाला बोलावण्यासाठी खोलीत पाठवले होते. नंतर आतून खोली बंद करण्यात आली होती. रक्षकाने खिडकीतून डोकावले असता, तेव्हा त्याला पृथ्वीराज हा फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडला आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला. 

काही महिन्यांपूर्वी तरुणाचे लग्न ठरले होते 

संबंधित प्रकरणात कुटुंबातील सदस्यांच्या मते, पृथ्वीराजचे काही महिन्यांपूर्वी लग्न ठरले होते. घरी लग्नाची जय्यत तयारी सुरु होती. पत्नीसोबत पृथ्वीराजचे अनेक दिवसांपासून बोलणं सुरु होतं. पण पृथ्वीराजने गळफास घेत जीवन संपवलं. 

हे ही वाचा : पुणे : कौटुंबिक वादातून नवऱ्याने बायकोची केली निर्घृण हत्या, नातेवाईकांकडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपास केला असता, सुसाईड नोट सापडली नाही. रविवारी पृथ्वीराजने त्याच्या बहिणीशी व्हिडिओ कॉलवर अनैपचारिक संभाषण केलं आणि वडील प्रयागराजमध्ये आल्याचं विचारण्यात आलं. अचानकपणे या घटनेनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.