12 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा विनयभंग! नेहमीच्या त्रासाला कंटाळून शाळा सोडली, पण शेवटी वाटेत अडवून भयंकर कृत्य

एका 12 वीच्या विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेला वाटेत अडवून तिच्यावर हल्ला केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. संबंधित विद्यार्थ्याने पीडित शिक्षिकेचे ओठच कापल्याची माहिती आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:04 AM • 05 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

12 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा विनयभंग!

point

नेहमीच्या त्रासाला कंटाळून शाळा सोडली

point

पण शेवटी वाटेत अडवून भयंकर कृत्य

Crime News: एका 12 वीच्या विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेला वाटेत अडवून तिच्यावर हल्ला केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. संबंधित विद्यार्थ्याने पीडित शिक्षिकेचे ओठच कापल्याची माहिती आहे. सध्या, पीडितेची प्रकृती गंभीर असून तिला आग्रा येथे रेफर करण्यात आलं असून तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. संबंधित घटना ही उत्तर प्रदेशच्या मैनपूरी येथे घडली असून या भयानक घटनेचा व्हिडीओ सुद्धा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. 

हे वाचलं का?

विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा विनयभंग... 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण बऱ्याच काळापासून तिच्या शिक्षिकेला त्रास देत होता. इतकेच नव्हे तर, त्याने शाळेत पीडित शिक्षिकेचा विनयभंग सुद्धा केला. पीडितेने आरोपी विद्यार्थ्याच्या घरी तक्रार केल्यानंतर, तो काही दिवस शांत राहिला मात्र, त्याने पुन्हा शिक्षिकेला त्रास द्यायला सुरूवात केली. 

शिक्षिकेवर हल्ला करत ओठ कापले 

वृत्तानुसार, विद्यार्थ्याच्या सततच्या छळामुळे त्या महिला शिक्षिकेला शाळा सुद्धा सोडावी लागली. पण, तरीसुद्धा आरोपी तरुणाने तिला त्रास देणं थांबवलं नाही. त्याने तिचा पाठलाग करणं सुरूच ठेवलं. त्यानंतर, एके दिवशी पीडित शिक्षिकेने विद्यार्थ्याच्या या वागण्याचा कडाडून विरोध केला आणि त्यावेळी आरोपीने रागाच्या भरात त्याची मर्यादाच ओलांडली. त्याने आपल्या शिक्षिकेवर विरोध केला आणि तिचे ओठ कापले. 

हे ही वाचा: प्रेयसीच्या आईलाही शिवम आवडायचा; नकार देताच आई संतापली, शिवमसोबत नेमकं काय केलं?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता ट्यूशनला जात असताना आरोपीने तिला वाटेतच रोखलं आणि तिच्यावर हल्ला करून तिचे ओठच कापले. यानंतर, आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. गंभीररित्या जखमी झालेल्या शिक्षिकेला जिल्हा रुग्णालयातून आग्रा येथे रेफर करण्यात आलं आणि तिथे एका खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडितेच्या भावाने आरोपी विद्यार्थ्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.