Crime News : उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका खासगी विद्यापीठात परदेशी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. याच प्रकरणी संबंधित आरोपीची शुक्रवारी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. ऑक्टोबर 2024 मध्ये दिल्लीतील काश्मिरी गट पोलीस ठाणे परिसरातील स्टेशनमध्ये शून्य एफआरआय अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यासंबंधीत तपासासाठी देहारादून पोलिसांकडे पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : राष्ट्रवादीच्या विलीनिकरणावर शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य, म्हणाले 'मी अजित दादांची शपथ...'
झोपेत लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा पीडितेचा आरोप
संबंधित प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता झाल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाने क्लेमेंटटाउन पोलीस ठाण्यात तत्कालीन तपास अधिकाऱ्यांविरुद्ध कडक टीका केली. त्यात म्हटलं की, "तपास अधिकारी उपनिरीक्षक संजीत कुमार यांनी या प्रकरणातील वैज्ञानिक पुराव्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. संबंधित प्रकरणात विद्यार्थिनीने आरोप केला की, तिच्यावर झोपेत लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. पोलिसांनी पीडितेची बेडशीट आणि घटनास्थळी आढळून आलेले कपडे फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त करून पाठवणे अपेक्षित होते, पण तसं काही घडलं नाही".
परदेशी विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप
पीडिता ही दक्षिण अफ्रिकेतील असून ती शिक्षणासाठी देहारादून येथे बॅचलर पदवीचे शिक्षण घेत होती. तिने पोलिसांना सांगितलं की, 29 ऑक्टोबर महिन्यात 2024 मध्ये रात्री तिच्या गटाने क्लेमेंटटाउन पोलीस ठाणे परिसरात एक निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता, तेव्हा तिच्या संस्थेतील अनेकजण घटनास्थळी उपस्थित होते, ती झोपली असताना आरोपी मुसाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
हे ही वाचा : 'प्रफुल पटेलांची NCP चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालीए', भाजपच्या मोठ्या मंत्र्याने केली थेट घोषणा.. महाराष्ट्रात उडाली गडबड!
न्यायालयाने फेरतपास करताना काय सांगितलं?
या प्रकरणी न्यायालयाने फेरतपास करताना, विद्यार्थिनीने कबूल केलं की, तिने आणि तिच्या सर्व मैत्रिणींनी पार्टीमध्ये मद्यपानाचे सेवन केलं होतं. यामुळे नेमकं कोणी चुकीचा स्पर्श केला, याची माहिती तिला देता आली नव्हती. पार्टीत असलेल्यांनी सांगितलं की, पीडित आणि आरोपी हे दोघेही वेगवेगळ्या खोलीत झोपले होते. एका विद्यार्थ्याने साक्ष दिलं की, त्याने रात्री पीडितेच्या आरोडण्याचा आवाज ऐकला होता, तो आवाज ऐकूण विद्यार्थी पीडितेच्या खोलीत गेला होता, पण त्या खोलीत कोणच नव्हतं.
ADVERTISEMENT











