15 दिवसांच्या बाळाचं अपहरण अन्... आरोपी यूनुस सिंधी अटकेत; आंतरराज्यीय बाल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश

एका आंतरराज्यीय बाल तस्करी रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या एजंटला अटक करण्यात आली आहे. आरोपी हैदराबादमध्ये हे मुल विकण्यापूर्वीच संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. तसेच, हे बाळ नेमकं कोणत्या ठिकाणाहून आणण्यात आलं? याचा पोलीस तपास करत आहेत.

आंतरराज्यीय बाल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश

आंतरराज्यीय बाल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई तक

• 04:48 PM • 05 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

15 दिवसांच्या बाळाचं अपहरण अन्...

point

आरोपी यूनुस सिंधी अटकेत

point

आंतरराज्यीय बाल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश

Crime News: मुलांच्या अपहरण आणि तस्करी प्रकरणात गुन्हे शाखेला मोठं यश मिळालं आहे. एका आंतरराज्यीय बाल तस्करी रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या एजंटला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, क्राइम ब्रांचने यापूर्वी 15 दिवसांच्या बाळासह तीन आरोपींना अटक केली होती आणि आरोपी हैदराबादमध्ये हे मुल विकण्यापूर्वीच संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. तसेच, हे बाळ नेमकं कोणत्या ठिकाणाहून आणण्यात आलं? याचा पोलीस तपास करत आहेत. 

हे वाचलं का?

बाल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश

15 दिवसांच्या बाळाच्या तस्करीप्रकरणी गुन्हे शाखेने आणखी एका संशयिताला अटक केली आहे. अहमदाबाद क्राइम ब्रांचने बनासकांठा असोसिएशनच्या सहकार्याने युनूस खान उर्फ युनूस सिंधी याला अटक केली. यापूर्वी गुन्हे शाखेने वंदना पांचाळ, रोशन अग्रवाल आणि सुमित यादव या आरोपींना अटक केली होती. एअरपोर्टजवळील नोबल नगरमध्ये यापूर्वी अटक करण्यात आलेले तिघेही आरोपी हैदराबाद येथील नागराज या आरोपीला 15 दिवसांच्या बाळाला विकण्याच्या तयारीत होते. गुन्हे शाखेने त्यांना अटक केली असून बाल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला. 

बाळाच्या बदल्यात 3.60 लाख रुपये दिले... 

आरोपी यूनुस सिंधी याच्या चौकशीदरम्यान समोर आलं की, त्याने हे 15 दिवसांचे बाळ हिम्मतनगरमधील गोविंद नावाच्या पुरवठादाराकडून घेतले होतं आणि यापूर्वी अटक केलेल्या तिन्ही आरोपींनी युनूसला बाळाच्या बदल्यात 3.60 लाख रुपये दिले होते. यामध्ये वंदनाच्या बँक अकाउंटमधून 2 लाख रुपयांचा चेकसुद्धा मिळाला होता. याव्यतिरिक्त, यूनुसच्या मोबाईल आणि बँक अकाउंटचा तपास करण्यासाठी गोविंदच्या नावावर एका व्यक्तीचा मोबाईल नंबर देखील मिळाला आणि त्याच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. यासोबतच, यूनुसच्या बँक अकाउंटमध्ये पैसे कोणी आणि कुठून ट्रान्सफर केले? याचा देखील पोलीस तपास करत आहेत. 

हे ही वाचा: जळगाव: जंगलात आढळला अर्धवट जळालेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह... परिसरात खळबळ

या तस्करी प्रकरणाचा तपास करताना असं आढळून आलं की अटक करण्यात आलेला आरोपी युनूसला 2022 मध्ये कालूपूरमधील एका मुलाचं अपहरण आणि तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केली होती. याव्यतिरिक्त, युनूस अहमदाबाद न्यायालयात हजर असताना वंदनाला भेटला तसेच आरोपी वंदना आणि रोशन अग्रवाल यांची देखील हैदराबाद प्रकरणातील न्यायालयीन सुनावणीदरम्यान भेट झाली. आरोपी गेल्या वर्षभरापासून एकत्र मिळून मुलांच्या तस्करीचं रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं. त्यामुळे, पोलिसांनी आरोपीने किती मुलांची तस्करी केली आहे? याचा तपास सुरू केला. याशिवाय, सापडलेल्या मुलाच्या अपहरणाबाबत काही गुन्हा दाखल झाला आहे का? या बाजूने सुद्धा तपास सुरू करण्यात आला आहे.

    follow whatsapp