आई वडिलांनी मुलाला जेवण आणण्यासाठी घराबाहेर पाठवले, नंतर घरात गळफास घेत दोघांनीही जीवन संपवलं

Crime News : एका मध्यमवयीन जोडप्याने त्यांच्याच फ्लॅटमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याचा आरोप आहे. मृतांची ओळख अजय कुमार (वय 55) आणि रीता (वय 50) अशी होती. त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या खोलीत लटकलेले आढळून आले होते. या घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 09:11 AM • 06 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

आई-वडिलांनी घेतला गळफास, सुसाईड नोटमध्ये काय? 

point

मुलाला जेवण आणायला पाठवून आई-वडिलांनी संपवलं जीवन

Crime News : एका मध्यमवयीन जोडप्याने त्यांच्याच फ्लॅटमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या आत्महत्येत मृतांची ओळख अजय कुमार (वय 55) आणि रीता (वय 50) अशी होती. त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या खोलीत लटकलेले आढळून आले होते. या घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दिल्लीतील ज्योतिनगरमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणावर शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य, म्हणाले 'मी अजित दादांची शपथ...'

आई-वडिलांनी घेतला गळफास, सुसाईड नोटमध्ये काय? 

पोलिसांनी तपास करताच घटनास्थळी सुसाईड नोट सापडली. त्या सुसाईड नोटमध्ये आपल्या मुलाला मिळालेल्या अपयशाने, कर्ज व्यवसायातील समस्या यांचा उल्लेख केला. त्यांच्या आत्महत्येला इतर कोणीही व्यक्ती जबाबदार नसल्याचे समजले. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला होता. दरम्यान, अजय कुमारचे सोनिया विहारमध्ये मेडिकल स्टोअर होते. तर पत्नी रीता ही हाऊस वाईफ होती. त्यांचा मोठा मुलगा भास्कर (वय 29) हा त्याच्या वडिलांसोबत मेडिकल सांभाळत होता. तर त्याचा लहान भाऊ शरद (वय 25) एका खासगी कंपनीत काम करत होता. 

मुलाला जेवण आणण्यास पाठवून आई-वडिलांनी केली आत्महत्या 

भास्करने याबाबत सांगितलं की, गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्याने जेवण मागितले होते, तेव्हा त्यांनी दोघांनाही भूक नसल्याचे सांगत बाहेरून जेवण आणण्यास सांगितलं होतं. रात्री 11:45 वाजता तो जेवण घेऊन परतला तेव्हा त्याला आपले आई वडील एका खोलीत गळफास लावून आढळून आले होते.  

हे ही वाचा : पत्नीचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर, पुतण्यासोबत शरीरसंबंध, 'तसले' कृत्य करताना नवऱ्याचा काटा काढला

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत रुग्णालयात नेले होते, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नेत कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. आई वडिलांनी आत्महत्या का केली असेल याचा पोलीस तपास करत आहेत. 

    follow whatsapp