PM Modi: 'पवार या वयात कुटुंबाला सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्र काय सांभाळणार', मोदींची बोचरी टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

'कुटुंबाला सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्र काय सांभाळणार', मोदींनी केली टीका
'कुटुंबाला सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्र काय सांभाळणार', मोदींनी केली टीका
social share
google news

Maharashtra Lok Sabha Election 2024: मुंबई: 'या वयात कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत, ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?', अशी अत्यंत बोचऱ्या शब्दात पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी महाराष्ट्रात भाजपसमोर मोठं आव्हान उभं केलंय. पण याचबाबत बोलताना पंतप्रधान मोदींनी आता पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. (lok sabha election 2024 sharad pawar cant take care of his family at this age what will maharashtra take care of pm modi criticism)

ADVERTISEMENT

टीव्ही 9 मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीवर आणि विशेषत: शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पाहा यावेळी पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले..

'या वयात कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत, ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?', मोदींनी पवारांना डिवचलं.. 

प्रश्न: शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे एक भावनिक मुद्दा आहे.. त्यांचा पक्ष फुटला, कुटुंब फुटलं.. तुम्हाला वाटत नाही का? भाजपसमोर महाराष्ट्रात हे मोठं आव्हान आहे म्हणून? हे इमोशनल कार्ड त्यांच्याकडे आहे. 

हे वाचलं का?

पंतप्रधान मोदी: महाराष्ट्रातील मतदार हा आमच्यासोबत भावनिकदृष्ट्या जोडला गेला आहे. जिथवर शरदरावांचा मुद्दा आहे.. ही राजकीय अडचण नाहीच.. त्यांनी हा कितीही राजकीय मुद्दा बनवला तरी ही गोष्ट महाराष्ट्रातील जनेतला कशी पचनी पडेल?

हे ही वाचा>> ''ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनाही दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर''

ही पूर्णपणे त्यांची कौटुंबिक अडचण आहे, घरातील भांडण आहे. वारसा हा काम करणाऱ्या पुतण्याला द्यावा की, वारसा मुलगी आहे तर तिला द्यावं.. भांडण हे त्यातील आहे.. त्यामुळे महाराष्ट्रात भावना विरुद्ध द्वेष असं वातावरण आहे.. 

ADVERTISEMENT

या वयात कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत, ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?

म्हणूनच सगळी भावनात्मक बाजू ही आमच्या बाजूने आहे.. 

ADVERTISEMENT

असं उत्तर देत पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. 

'भटकती आत्मा' म्हणत मोदींनी केलेला पवारांवर हल्लाबोल...

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील प्रचार सभांमध्ये 'भटकती आत्मा' शरद पवारांवर राजकीय टीका केली होती. 

'आमच्याकडे असं म्हटलं जातं की, आपल्याकडे काही 'भटकती आत्मा' असतात.. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही, ज्यांचे स्वप्न अपूर्ण राहतात ते आत्मे भटकत राहतात. स्वत:चं काही झालं नाही तर दुसऱ्यांच्या गोष्टी बिघडविण्यात त्यांना मजा येते.'

हे ही वाचा>> 'शिंदेंचं-ठाकरेंसोबत साटंलोटं, मुलासाठी ठाणे...', BJP पदाधिकाऱ्याचा आरोप

'आमचा महाराष्ट्र देखील अशा भटकती आत्म्यांचा शिकार झाला आहे. आजपासून 45 वर्षांपूर्वी येथील एका मोठ्या नेत्याने स्वत:च्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र हा अस्थिरतेमध्ये गेला. यामुळेच अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळ देखील पूर्ण करू शकले नाहीत.'

'2019 मध्ये त्यांनी जनादेशाचा एवढा मोठा अपमान केला हे महाराष्ट्रातील जनता निश्चितच जाणून आहे. आज फक्त महाराष्ट्राला अस्थिर करणं हे या आत्म्याला समाधान मिळत नाही तर देशाला अस्थिर करण्याचा खेळ सुरू आहे.' 

'आज भारताला अशा भटकती आत्मापासून वाचवून देशात एक स्थिर, मजबूत सरकार देऊन पुढे जाणं गरजेचं आहे.' अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी पुण्यातील जाहीर सभेत केली होती.

शरद पवार काय देणार प्रत्युत्तर? 

पंतप्रधान मोदी हे मागील काही दिवसांपासून शरद पवारांवर अनेक शाब्दिक हल्ले चढवत आहेत. त्यामुळे शरद पवार आता त्यांना नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

दुसरीकडे शरद पवार हे सातत्याने मोदी सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत. तसंच जर पुन्हा मोदी सरकार निवडून आलं तर संविधानच बदललं जाईल असेही आरोप करत आहेत. 

त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मतदार हा कोणाला कौल देणार  हे पाहणं अत्यंत रंजक  ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT