बँक कर्मचाऱ्याची प्रायव्हेट पार्ट दाबून हत्या, कर्मचाऱ्याच्या वडिलांचा सुनेवरच संशय; नेमकं काय घडलं?
Crime News : एका खासगी बँक कर्मचाऱ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृताच्या वडिलांनी आपल्या सुनेवर मुलाची गुप्तांग दाबून हत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. दरम्यान, सासऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली आहे.राजीव कुमार (37) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बँक कर्मचाऱ्याची प्रायव्हेट पार्ट दाबून हत्या
कर्मचाऱ्याच्या वडिलांचा सुनेवरच संशय
नेमकं काय घडलं?
Crime News : एका खासगी बँक कर्मचाऱ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृताच्या वडिलांनी आपल्या सुनेवर मुलाची गुप्तांग दाबून हत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. दरम्यान, सासऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली आहे.राजीव कुमार (37) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
हे ही वाचा : अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीला शेजाऱ्याने उचलून नेलं, 2.5 किलोमीटर दूर नेऊन निर्जनस्थळी अत्याचार
'राजीव व्हरांड्याचत पडला होता'
राजीव उत्तर प्रदेशातील बेगुसराय परिसरात एका भाड्याच्या घरात आपली पत्नी आणि मुलांसोबत राहत होता आणि एका खासगी बँकेत कार्यरत होता. पत्नी सुषमा कुमारी उर्फ पूर्वी हिच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी रात्री राजीव मद्यधुंद अवस्थेत घरी आला होता, ज्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर राजीव घराबाहेर गेला आणि बराच वेळ परतला नाही. जेव्हा ती बाहेर पाहायला गेली, तेव्हा राजीव व्हरांड्यात पडलेला होता आणि त्याच्या गळ्यात गमछा गुंडाळलेला होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
गुप्तांग दाबून हत्या
दुसरीकडे, मृताचे वडील रामाशीष सिंह यांनी पत्नीवर हत्येचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असत. यापूर्वीही झालेल्या मारहाणीत राजीवचे डोके फुटले होते आणि त्याच्या नाक-कानावर टाके पडले होते. पत्नी आपल्याला जिवंत सोडणार नाही अशी भीती राजीवने अनेकदा व्यक्त केली होती, असा दावा वडिलांनी केला आहे. मुलाचे गुप्तांग दाबून हत्या करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.