Maharashtra Weather : राज्यातील 'या' विभागांत तापमानात वाढ होण्याची शक्यता, हवामानाचा महत्त्वाचा अलर्ट

मुंबई तक

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने 21 फेब्रुवारी रोजी राज्यात कोरडे हवामान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील विविध भागांत हळूहळू तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषत: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता नाही, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
google news

बातम्या हायलाइट

point

उपविभागांत कोरडं हवामान राहण्याची शक्यता

point

पुणे, मुंबई आणि नाशिकसारख्या शहरांत हवामानाची शक्यता कशी? 

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने 21 फेब्रुवारी रोजी राज्यात कोरडे हवामान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील विविध भागांत हळूहळू तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषत: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता नाही, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

हे ही वाचा : '..यासाठी मी त्यांना परत भेटीन' एकनाथ शिंदेंच्या भेटीबद्दल काय म्हणाले राज ठाकरे?

उपविभागांत कोरडं हवामान राहण्याची शक्यता

कोकण विभागात दक्षिण कोकण आणि गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील सर्व उपविभागांत कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील काही दिवसांत 4-5 दिवसांत 2-3 अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. 

पुणे, मुंबई आणि नाशिकसारख्या शहरांत हवामानाची शक्यता कशी? 

दरम्यान पुणे, मुंबई आणि नाशिकसारख्या शहरांत दिवसभरात तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तसेच वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे, दिवसा तीव्र उष्णता जाणवेल आणि सकाळी हलका थंडावा जाणवेल. आयएमडीने राज्यात उष्णतेच्या लाटेच्या स्थिती तयार होत असल्याचा इशारा दिला आहे.

हे ही वाचा : चंद्रपूर : कारल्याची भाजी बनवल्याचा लेकाला राग, नंतर आईचीच केली निर्घृणपणे हत्या

नागपूर प्रादेशिक केंद्राने देखील विदर्भात कोरडं हवामान राहण्याचा अंदाज आहे. आयएमडीच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्रात दक्षिणेकडील प्रणालीचा प्रभाव मर्यादित राहील. 

हे वाचलं का?