यवतमाळ जिल्ह्याच्या 'या' तालुक्यात सहा महिन्यांपासून 34 आदिवासी मुली बेपत्ता?, डोकं चक्रवणारं प्रकरण

मुंबई तक

Yavatmal crime :  यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यात सहा महिन्यांपासून 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुली मानवी तस्करीच्या बळी ठरलेल्या आहेत, अशी भीती व्यक्त केली जातेय.

ADVERTISEMENT

Yavatmal crime
Yavatmal crime
google news

बातम्या हायलाइट

point

यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यात सहा महिन्यांपासून 34 आदिवासी मुली बेपत्ता

point

आरोपीला मदत केल्याच्या संशयातून पोलीस कर्मचार्‍यावर निलंबनाची कारवाई

Yavatmal Crime : भास्कर मेहरे - यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यात सहा महिन्यांपासून 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुली मानवी तस्करीच्या बळी ठरलेल्या आहेत, अशी भीती व्यक्त केली जातेय. या प्रकरणातील बेपत्ता झालेल्या मुलींपैकी एका मुलीचा आणि तिच्या प्रियकराच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली. त्याच क्लिपमध्ये मुलगी मुलींच्या तस्करीच्या कार्यपद्धीबाबत बोलतेय.  

हे ही वाचा : आईचे लिव्ह-इन पार्टनरशी प्रेमसंबंध, 5 वर्षाच्या दिव्यांग मुलावर मासाला टाकून केला हल्ला, क्रूरतेचा कळस हादरवून टाकेन

मुख्य आरोपीची मझहर कुरेशी ओळख

संबंधित प्रकरणाकडे पोलिसांनी आवश्यक गांभीर्याने पाहिले नाही, असा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीची राळेगाव येथील मझहर कुरेशी अशी ओळख पटल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी सुरुवातीला त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, नंतर त्याची सुटका केली. तो तरुण तेलंगणाकडे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी अटक केली. 

आरोपीला मदत केल्याच्या संशयातून पोलीस कर्मचार्‍यावर निलंबनाची कारवाई

आरोपीला मदत केल्याच्या संशयातून कोणत्याही पोलीस कर्मचार्‍याला चालू तपासातून वगळावे आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. अशातच आदिवासी मुलींच्या पालकांना आर्थिक प्रलोभनं देऊन त्यांची फूस लावून त्यांना पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला, ही अत्यंत गंभीर बाब आहे. 

हे ही वाचा : इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असलेली सोन्यासारखी मुलगी जीवानिशी गेली, अनुपमासोबत बॉयफ्रेंडने काय केलं?

गृह खात्याला याबाबत माहिती देण्यात आली असून, राज्य सरकारवरही या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. याव्यतिरिक्त लव्ह जिहाद आणि धर्मांतरसारख्या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे. 

हे वाचलं का?