नाशिक पुन्हा हादरले! दारु पाजून तरुणीवर लैंगिक अत्याचार, 'गजवा-ए-हिंद'चा उल्लेख केल्याचा आरोप
नाशिकमधील एका आयटी कंपनीतील प्रकरण ताजं असतानाच त्याच प्रकारचं दुसरं प्रकरण उघडकीस आलं आहे. पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये एका तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नाशिक पुन्हा हादरले!
दारु पाजून तरुणीवर लैंगिक अत्याचार
गजवा-ए-हिंदचा उल्लेख केल्याचा आरोप
Nashik Crime, प्रवीण ठाकरे : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील एका आयटी कंपनीतील प्रकरण ताजं असतानाच त्याच प्रकारचं दुसरं प्रकरण उघडकीस आलं आहे. पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये एका तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. या तक्रारीत तरुणीने म्हटलं आहे की, तंजीर इनामदार नावाच्या एका तरुणाने तिचे लैंगिक शोषण केले असून तिच्या गळ्यातील माळ काढून नंतर तिच्यावर अत्याचार केले.
दारु पाजून लैंगिक अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित तंजीर इनामदार याने पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन जबरदस्तीने दारु पाजली आणि सिगारेटही ओढायला लावली. यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच संशयिताने पीडितेच्या गळ्यातील तुळशीची माळ आणि हातात बांधलेले धार्मिक धागे तोडून फेकून दिले. पीडितेने असाही आरोप केला आहे की, गजवा ए हिंदच्या नावावर एका धार्मिक रीती-रिवाज मान्य करण्यास भाग पाडले. तसेच मानसिक आणि शारीरिकरित्या टॉर्चर केले.
हेही वाचा : थारचा अपघात झाला नव्हता, मेहुणा आणि मेहुणीच्या अफेअरमुळे झालं खुनी कांड, कसा झाला खुलासा?
वेगवेगळ्या लॉजवर नेऊन बलात्कार
जानेवारी 2026 मध्ये संशयिताने पीडितेच्या गळ्यावर दाताने चावले होते आणि त्याचा फोटोही त्याने काढला होता. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वेगवेगळ्या लॉजवर नेऊन बलात्कार केला. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पोलिस स्टेशन गाठले. अजून काही मुलींना आरोपीने फसवले असल्याची शंका पोलिसांना आहे. दरम्यान, एका पीडितेने समोर येऊन तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलीस अधिक तपास करत आहेत. आज संशयित आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला 5 दिवसांची पोलिस कस्टडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा : माहेरी असतानाच नवऱ्याने नर्सची केली हत्या, इंजेक्शन देऊन जीव घेतला, नेमकं कारण काय?
नाशिकमध्ये खळबळ
या घटनेमुळे शहरात लव जिहाद आणि बळजबरीने धर्मांतरणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. शांत आणि धार्मिक शहर मानले जाणाऱ्या नाशिकमध्ये अशा प्रकरणांमुळे चांगलीच खळबळ माजली आहे.









