कल्याण : कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात, काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर

मिथिलेश गुप्ता

नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्ष राजा पातकर यांना कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

ADVERTISEMENT

Kalyan Congress Dispute
Kalyan Congress Dispute
google news

बातम्या हायलाइट

point

कल्याण : कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात

point

काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर

Kalyan Congress Dispute : कल्याणमध्ये काँग्रेस पक्षाच्या बैठकीदरम्यान मोठा वाद उफाळून आला असून, गटनेत्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्ष राजा पातकर यांना कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

हे ही वाचा : PM Modi: 'त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळेल...', PM मोदींना राग अनावर, काँग्रेसवर भडकले!

बैठकीत वाद अन् शिवीगाळ

मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान काही मुद्द्यांवरून वाद निर्माण झाला. या वादात जिल्हाध्यक्ष राजा पातकर यांनी कांचन कुलकर्णी यांच्याशी कथितरित्या शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर संतापलेल्या कुलकर्णी यांनी त्यांना कानशिलात लगावल्याचे समोर आले आहे. या संदर्भात कांचन कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्षांनी शिवीगाळ केल्यामुळे मी त्यांना मारले असा खुलासा केला आहे. मात्र त्यांनी कॅमेरासमोर अधिक बोलण्यास नकार दिला. 

हे ही वाचा : तरुणीसोबत वृद्ध नेत्याचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ, काँग्रेस-भाजपमध्ये चांगलीच जुंपली

'हा प्रकार किरकोळ'

दरम्यान, राजा पातकर यांनी हा प्रकार किरकोळ असल्याचे सांगत हा आमच्या कुटुंबातील वाद आहे आणि कुटुंबामध्ये अशा छोट्या गोष्टी घडत असतात असे म्हणत प्रकरण वाढू नये यासाठी प्रयत्न केले. तरीही ही घटना कार्यकर्त्यांसमोर घडल्याने काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. या प्रकारामुळे कल्याण-डोंबिवली परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले असून, पक्षांतर्गत शिस्त आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 

हे वाचलं का?