बीड : जेव्हा लज्जाही लज्जेने लाजते.., सावत्र आई सवतीच्या मुलासोबत पळून गेली; पुढे काय घडलं?
Beed Crime News : बीडमध्ये एका 40 वर्षीय सावत्र आईने आपल्या सवतीच्या मुलासोबत पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, त्यांनी पळून जाण्यासाठी जावयाची दुचाकी वापरली आहे. तेलंगणामध्ये या दुचाकीला ट्रॅफिक दंड झाल्याचा मेसेज आल्यानंतर हे प्रेमी युगुल राज्याबाहेर गेल्याचे उघड झाले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बीड : जेव्हा लज्जाही लज्जेने लाजते..,
सावत्र आई सवतीच्या मुलासोबत पळून गेली; पुढे काय घडलं?
Beed Crime News : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका गावातून आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य व्यक्ती म्हणजे गावातील एक मध्यमवयीन गृहस्थ, ज्यांचा संसार अनेक वर्षांपासून सुरू होता. या इसमाला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आणि दोन मुली आहेत. दोन्ही मुलींची लग्ने झाली असून त्या आपापल्या सासरी सुखाने नांदत आहेत, तर दोन्ही मुले आपल्या वडिलांसोबतच राहून शेतीकामात मदत करतात. दरम्यान, पहिल्या पत्नीसोबत सतत भांडण होत असल्याने ती गेल्या पंधरा वर्षांपासून या कुटुंबापासून वेगळी राहत आहे. आपली मुले आणि घरातील जबाबदारी सांभाळण्यासाठी या इसमाने चार वर्षांपूर्वी एका परित्यक्ता महिलेशी दुसरे लग्न केले होते. तेव्हापासून ही चाळीस वर्षांची सावत्र आई आणि त्या इसमाची दोन तरुण मुले एकाच घरात राहत होती. मात्र, काही काळापासून या सावत्र आईचे आणि सवतीच्या एका मुलाचे आपसात प्रेमसंबंध जुळले आणि त्यांच्यातील नात्याचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेले.
हेही वाचा : निष्पाप चेहऱ्यामागे थंड डोकं आणि 'तो'.., ऊसाचा रस.., स्पीकरच्या तारा; सगळं उद्धवस्त
घरात कोण कोणासोबत राहत होतं आणि पळून जाण्याचा कट?
या नात्याला आता वासनेची ओढ लागली होती, ज्यामुळे त्यांना आपल्या पवित्र नात्याचेही भान राहिले नाही. 12 एप्रिल रोजी या महिलेचा पती मुंबई येथील रत्नेश्वरी देवीच्या यात्रेसाठी आणि देवदर्शनासाठी घरून निघाला. पती घरी नसल्याची आणि मुले सोबत असल्याची संधी साधून सावत्र आई आणि मुलाने पळून जाण्याचा प्लॅन आखला. 15 एप्रिल रोजी ही 40 वर्षांची महिला आपल्या सवतीच्या मुलासोबत घरातून पसार झाली. विशेष म्हणजे, पळून जाण्यासाठी त्यांनी स्वतःची गाडी न वापरता या इसमाच्या जावयाची मोटारसायकल चोरून नेली. या महिलेने केवळ आपल्या पतीचा विश्वासघात केला नाही, तर आई-मुलाच्या नात्यालाही काळिमा फासला. जेव्हा या महिलेचा पती देवदर्शनावरून परतला, तेव्हा त्याला आपली पत्नी आणि मुलगा दोघेही गायब असल्याचे समजले आणि पायाखालची जमीनच सरकली. पळून गेलेली पत्नी आणि पळवून नेणारा मुलगा अशा कात्रीत तो बाप अडकला आहे.
तेलंगणात कसं फुटलं भाडं आणि पोलिसांचा तपास?
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना एक विलक्षण माहिती मिळाली. पळून जाण्यासाठी त्यांनी वापरलेली दुचाकी (क्रमांक एम एच 13/बी यू 1587) ही जावयाच्या नावे असल्याने, 16 एप्रिल रोजी सकाळी तेलंगणा राज्यातील पोलिसांनी या गाडीवर ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारला. तेलंगणातील इंदिरा नगर आणि गच्चीबोली भागात 1,235 रुपयांचा दंड करण्यात आल्याचा मेसेज जेव्हा जावयाच्या मोबाईलवर आला, तेव्हा हे प्रेमी युगुल महाराष्ट्र सोडून तेलंगणा राज्यात गेल्याचे स्पष्ट झाले. या एका मेसेजमुळे पोलीस तपासाला वेग आला असून हे जोडपे नेमके कुठे लपून बसले आहे, याचा छडा आता तेलंगणा पोलिसांच्या मदतीने लावला जात आहे. जावयाची गाडी, सवतीचा मुलगा आणि स्वतःची पत्नी अशा तिहेरी पेचात हा बाप अडकला असून, पळून जाताना त्यांनी वापरलेल्या शक्कलमुळे पोलीसही अवाक झाले आहेत.









