रमजानचा महिना असल्याने माहेरी आली महिला, मावशीने बागेत फिरवून आणण्याचे बहाण्याने नेलं, अन् कांड केलं

मुंबई तक

Crime News : पोलिस आणि स्थानिकांच्या माहितीनुसार, आरोपी महिलेचे नाव अजरा (वय 30) असे आहे. अजरा हिने पार्कमध्ये फिरायला नेण्याच्या बहाण्याने चिमुकल्या हादीला सोबत नेले. परिसरात शांतता असल्याचा फायदा घेत तिने त्याचा गळा आवळल्याचा आरोप आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रमजानचा महिना असल्याने माहेरी आली महिला

point

मावशीने बागेत फिरवून आणण्याचे बहाण्याने नेलं, अन् कांड केलं

Crime News : दिल्लीतील मुखर्जी नगर परिसरात शुक्रवारी (दि.20) दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. रमजाननिमित्त माहेरी आलेल्या महिलेच्या आयुष्यात आनंदाऐवजी दुःखाचे सावट पसरले. तिच्या सख्ख्या बहिणीनेच 21 महिन्यांच्या भाच्याची गळा आवळून हत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती महिलेच्या भावाने पोलिसांना दिली.

पोलिसांना दुपारी पीसीआर कॉल

Delhi Police यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी सुमारे 1:30 वाजता पीएस मुखर्जी नगर येथे डीडी क्रमांक 62 अंतर्गत पीसीआर कॉल प्राप्त झाला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने “माझ्या भाच्याचा मृत्यू झाला असून त्याची हत्या माझ्या बहिणीने केली आहे,” अशी माहिती दिली. ही घटना एसएफएस फ्लॅट्स, मुखर्जी नगर येथील एका उद्यानात घडल्याचे सांगण्यात आले.

आरोपी कोण?

पोलिस आणि स्थानिकांच्या माहितीनुसार, आरोपी महिलेचे नाव अजरा (वय 30) असे आहे. अजरा हिने पार्कमध्ये फिरायला नेण्याच्या बहाण्याने चिमुकल्या हादीला सोबत नेले. परिसरात शांतता असल्याचा फायदा घेत तिने त्याचा गळा आवळल्याचा आरोप आहे.

घटनेदरम्यान तेथून जाणाऱ्या एका स्थानिक रहिवाशाने हा प्रकार पाहिला आणि तात्काळ हस्तक्षेप करून मुलाला तिच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर मुलाला तातडीने जवळच्या न्यू लाइफ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत बालकाची ओळख हादी (वय 21 महिने) अशी आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp