एका बाजूला अक्षता पडत होत्या; तर दुसरीकडे अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गावात संतापाची लाट
Crime News : सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. अनेकजण आपल्या मुलाबाळांसह लग्नाला जात आहेत. अशाच एका लग्न समारंभासाठी गेलेल्या एका 15 वर्षीय मुलीसोबत अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका बाजूला लग्न सुरु असताना दुसरीकडे या मुलीवर बलात्कार करण्यात येत होता. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
ADVERTISEMENT

Crime News : सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. अनेकजण आपल्या मुलाबाळांसह लग्नाला जात आहेत. अशाच एका लग्न समारंभासाठी गेलेल्या एका 15 वर्षीय मुलीसोबत अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका बाजूला लग्न सुरु असताना दुसरीकडे या मुलीवर बलात्कार करण्यात येत होता. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बिहारच्या मुझफ्फरपूर परिसरातील ही घटना आहे.
हे ही वाचा : दुर्घटना लपवण्यासाठी केला मर्डर, नंतर नार्को टेस्टच्या भितीमुळे भावालाच संपवलं, दुहेरी हत्याकांडाचा कसा झाला उलगडा?
रात्रभर शोध सुरु
पीडित मुलगी आपल्या नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आली होती. लग्नाच्या गडबडीत असतानाच ती काल संध्याकाळपासून अचानक बेपत्ता झाली. बराच वेळ मुलगी न दिसल्याने चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. रात्रभर शोध घेऊनही तिचा पत्ता लागत नव्हता. शोध घेत असतानाच गावकऱ्यांना एका घराबाहेर मुलीची चप्पल पडलेली दिसली. यामुळे त्यांचा संशय बळावला.










