Lok Sabha Election 2024: 'BJP चे आमदार जास्त तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री..', 'यासाठी' मोदींनी शिंदेंना बनवलं CM!
PM Modi : एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री का बनवलं याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता एक मोठं विधान केलं आहे. जाणून घ्या पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

Why PM Modi Made CM to Eknath Shinde: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 च्या दृष्टीने भाजपसाठी महाराष्ट्र हे अत्यंत महत्त्वाचं असं राज्य आहे. अशावेळी स्वत: पंतप्रधान मोदी येथील राजकारणात जातीने लक्ष देत आहे. महाराष्ट्रात आजवर कधीही उद्भवली नव्हती अशी राजकीय परिस्थिती ही लोकसभा निवडणुकीत आहे. अशावेळी पंतप्रधान मोदी यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री याबाबत एक महत्त्वाचं विधान केलं आहे. (lok sabha election 2024 bjp has maximum number of mla but shiv sena still has chief minister this is my tribute to balasaheb thackeray said narendra modi)
'आमच्याकडे आज सर्वात जास्त आमदार आहेत पण तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे.. ही माझी बाळासाहेबांना श्रद्धांजली आहे..' असं म्हणत पंतप्रधान मोदींनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यामागची काय भूमिका होती हे स्पष्ट केलं. टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी हे विधान केलं आहे.
'यासाठी' एकनाथ शिंदेंना पंतप्रधान मोदींनी बनवलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री?
मुलाखतीत पंतप्रधान मोदींना असा प्रश्न विचारण्यात आला की, 'बाळासाहेब ठाकरे आणि तुमचे संबंध हे चांगले होते. तुम्ही त्यांचा सन्मानही करायचा.. ते तुमच्या बाजूने उभेही राहायचे.. आता आपण वारसाबाबत बोललात.. त्यामुळे तुम्ही उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे उत्तराधिकारी मानतात की नाही?'
हे ही वाचा>> पवार या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्र काय..: मोदी
पंतप्रधान मोदी: जिथवर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा मुद्दा आहे तर मी त्यासाठीच जगेन.. बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज विसरू शकत नाही.. अजिबात विसरू शकत नाही.










