आधी टोकन घ्या...,हायप्रोफाईल भागात कॉर्पोरेट स्टाईल देहविक्रीचा धंदा, स्पॉ सेंटरमधील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले!

Crime News Marathi : पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पाल परिसरातील राज वर्ल्ड शॉपिंग सेंटरमधील रूम नंबर 311 मध्ये ‘99 स्पा’च्या नावाखाली अनैतिक देहव्यापार सुरू होता. या माहितीनंतर पोलिसांनी एक विशेष पथक तयार करून नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकला. छापेमारीदरम्यान या रॅकेटचे अत्यंत शिताफीने आणि व्यावसायिक पद्धतीने केलेले व्यवस्थापन पाहून पोलिसही काही काळ अचंबित झाले.

Crime News Marathi

Crime News Marathi

मुंबई तक

06 Feb 2026 (अपडेटेड: 06 Feb 2026, 10:32 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आधी टोकन घ्या...,हायप्रोफाईल भागात कॉर्पोरेट स्टाईल देहविक्रीचा धंदा

point

स्पॉ सेंटरमधील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले!

Crime News Marathi :  : गुजरातच्या सूरत शहरातील पॉश परिसर म्हणून ओळखला जाणारा पाल परिसर पुन्हा एकदा वादग्रस्त कारणामुळे चर्चेत आला आहे. येथे एका नामांकित शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये स्पाच्या आड चालवले जाणारे हाय-प्रोफाइल देहव्यापाराचा रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून देहव्यापारात अडकवण्यात आलेल्या चार महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या घटनेमुळे सूरत शहरात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पाल परिसरातील राज वर्ल्ड शॉपिंग सेंटरमधील रूम नंबर 311 मध्ये ‘99 स्पा’च्या नावाखाली अनैतिक देहव्यापार सुरू होता. या माहितीनंतर पोलिसांनी एक विशेष पथक तयार करून नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकला. छापेमारीदरम्यान या रॅकेटचे अत्यंत शिताफीने आणि व्यावसायिक पद्धतीने केलेले व्यवस्थापन पाहून पोलिसही काही काळ अचंबित झाले.

पोलिसांच्या चौकशीत समोर आले की, या रॅकेटचे सूत्रधार अत्यंत चतूर होते. पोलिसांची हालचाल वेळीच लक्षात यावी यासाठी शॉपिंग सेंटरच्या प्रवेशद्वारावर विशेष सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. त्यामुळे कोणतीही कारवाई होण्यापूर्वीच संबंधितांना सतर्कता मिळू शकत होती. संपूर्ण व्यवहार कॉर्पोरेट पद्धतीने चालवला जात होता. प्रत्येक ग्राहकानुसार महिलांना विशिष्ट टोकन दिले जात होते आणि सर्व व्यवहारांचे तपशील एका डायरीत नोंदवले जात होते.

हेही वाचा : पुण्यात क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये वाद, आईवरून शिवीगाळ अन् दगडाने ठेचून संपवलं

या छाप्यात पोलिसांनी स्पाचा मॅनेजर शुंवरो बाबूराव चक्रवर्ती आणि त्याचा सहाय्यक विपिन उर्फ रिंकू जगदीश शाहू यांना अटक केली आहे. याशिवाय देहव्यापारासाठी आलेले तीन ग्राहक  करण दीपक शाह, वीरसिंह शांतिजी कोळी आणि उमेश दिलीप शर्मा यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या स्पाचा मुख्य मालक आकाश अंकुश धनावडे हा घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याला वॉन्टेड घोषित केले आहे.

झडतीदरम्यान पोलिसांनी देहव्यापारासाठी वापरलेले 7 मोबाईल फोन, ग्राहकांचे 11 मोबाईल फोन, 63 हजार रुपये रोख, टोकन्स आणि व्यवहारांची हिशोबाची डायरी जप्त केली आहे. या साहित्याच्या आधारे पोलिस पुढील तपास करत आहेत.

या कारवाईत सुटका करण्यात आलेल्या चार महिलांपैकी तीन महिला पश्चिम बंगालमधील, तर एक महिला कोलकात्याची रहिवासी असल्याचे समोर आले आहे. या सर्व महिलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने महिला संरक्षणगृहात पाठवण्यात आले आहे. महिलांना कोणत्या परिस्थितीत सूरतमध्ये आणण्यात आले, त्यांच्यावर दबाव होता का, तसेच या रॅकेटचे आंतरराज्य स्वरूप आहे का, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे सूरतमधील पॉश परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांनी अशा प्रकारच्या रॅकेटविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

आई वडिलांनी मुलाला जेवण आणण्यासाठी घराबाहेर पाठवले, नंतर घरात गळफास घेत दोघांनीही जीवन संपवलं
 

    follow whatsapp