दुहेरी हत्याकांडाने जळगाव हादरलं, प्रेमीयुगुलाचा खून, भाऊच ठरला वैरी

मुंबई तक

13 Aug 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:10 AM)

मनिष जोग, जळगाव, प्रतिनिधी जळगाव: राज्यसह संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना जळगावच्या चोपड्यात घडली. चोपड्यात प्रेमीयुगलाचा खून करण्यात आला आहे. त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर आरोपीने स्वता: पोलीस स्टेशनला हजर होऊन खून केल्याची कबुली दिली आहे. दुहेरी हत्याकांडाचा प्रकार नक्की कसा घडला? चोपडा शहर पोलीस स्थानकात […]

Mumbaitak
follow google news

मनिष जोग, जळगाव, प्रतिनिधी

हे वाचलं का?

जळगाव: राज्यसह संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना जळगावच्या चोपड्यात घडली. चोपड्यात प्रेमीयुगलाचा खून करण्यात आला आहे. त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर आरोपीने स्वता: पोलीस स्टेशनला हजर होऊन खून केल्याची कबुली दिली आहे.

दुहेरी हत्याकांडाचा प्रकार नक्की कसा घडला?

चोपडा शहर पोलीस स्थानकात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा पिस्टल घेऊन पोलिसात हजर झाला आणि आपण दोघांचा खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी चोपड्यालगत असलेल्या जुना वराड रोड शिवारात पाहणी केली असता नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले.

मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिसांनी दोन संशयित अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे तर दोघांचा शोध सुरु आहे. वर्षा समाधान कोळी (वय २०, रा.सुंदरगगढी, चोपडा) आणि राकेश संजय राजपूत (वय, २२, रा. रामपूर. चोपडा) असे मयत युगलाची नावं आहेत. प्रेम संबंधातून खून झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी मयत मुलीचा अल्पवयीन भाऊच फिर्यादी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तरुणीला पळवून नेण्याच्या बहाण्याने प्रियकर घरी आला अन्…

प्रियकर राकेश शुक्रवारी वर्षाला पळवून नेण्याच्या भावनेने तिच्या घरी आला असता त्यास चार जणांनी मिळून मारहाण केली. शिवीगाळ करुन त्याला नाल्याजवळ नेले आणि तिथे त्याचा गावठी कट्ट्याने गोळ्या घालून खून केला. प्रियकराचा खून केल्यानंतर आरोपी भावाने आपल्या बहिणाचा रुमालाने गळा आवळून खून केला.

रात्री हा सर्व प्रकार घडल्यानंतर स्वत: आरोपी पोलीस स्टेशनला गेला आणि आपल्या कृत्याची कबुली दिली. तुषार कोळी (रा. माचला ता. चोपडा), भरत संजय रायसिंग (रा. चोपडा), निलेश कोळी अशी इतर आरोपींची नावं आहेत. हा संपूर्ण प्रकार घडल्यातर जळगावच्या चोपड्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    follow whatsapp