बीड : भाजप आमदार सुरेश धसांना झटका! देवस्थानाच्या जमिनी लाटल्याच्या प्रकरणात गुन्हा

मुंबई तक

• 03:42 AM • 01 Dec 2022

आष्टी तालुक्यातील कथित आठ हिंदू देवस्थान जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणी अखेर भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी प्राजक्ता, बंधू देविदास, मनोज रत्नपारखी, अस्लम नवाब खान यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १ ९ ८८, बनावट कागदपत्रे तयार करून कट रचून फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील हिंदू देवस्थान जमीन […]

Mumbaitak
follow google news

आष्टी तालुक्यातील कथित आठ हिंदू देवस्थान जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणी अखेर भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी प्राजक्ता, बंधू देविदास, मनोज रत्नपारखी, अस्लम नवाब खान यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १ ९ ८८, बनावट कागदपत्रे तयार करून कट रचून फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

बीड जिल्ह्यातील हिंदू देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात गुन्हे दाखल करून चौकशी करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे पाठपुरावा करीत आहेत . खाडे यांच्याच याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १८ ऑक्टोबर रोजी राम खाडे यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून गुन्हे दाखल करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले होते.

खाडे यांनी आपल्या तक्रारीत आमदार सुरेश धस यांचे नाव घेतलेले असल्याने आमदार सुरेश धस यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवीत आमदार सुरेश धस यांची याचिका फेटाळली आहे.

दरम्यान, तक्रारदार राम खाडे यांची १३ जानेवारी २०२२ ची तक्रारच एफआयआर समजून गुन्हा दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते, त्यानुसार २९ नोव्हेंबर रोजी कलम १३ (१) ( अ ) ( ब ), १३ ( २ ) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ सह कलम- ४२०,४६५ , ४६७ , ४६८ , ४७१,१२० ( ब ) १० ९ भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास एसीबीचे उपअधीक्षक शंकर शिंदे करत आहेत .

आमदार धस यांनी पदाचा गैरवापर करून इतर आरोपींशी कट करून देवस्थानाच्या इनाम जमीन, शासनाच्या जमीन, सहकार विभागाच्या जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करून ते खरे आहेत, असे भासविले . देवस्थानच्या इनाम जमिनी बेकायदेशीर मार्गाने खालसा आदेश करून घेऊन मनोज रत्नपारखी व इतरांच्या नावे करून शासनाची फसवणूक केली. बेकायदेशीर मार्गाने स्वतः चे व इतरांचे नावाने कोट्यावधी रुपयाची अपसंपदा मिळवली असा ठपका ठेवलेला आहे.

    follow whatsapp