आईची तब्येत बिघडली, शुटींग सोडून अभिनेता Akshay Kumar मुंबईत दाखल

मुस्तफा शेख

• 12:42 PM • 06 Sep 2021

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारच्या आईची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अक्षय कुमारच्या आईची तब्येत सध्या गंभीर असल्याचं कळतंय. आईची तब्येत बिघडल्याची बातमी समजताच अक्षय कुमार लंडनवरुन आपलं शुटींग सोडून मुंबईत दाखल झाला आहे. अक्षय कुमारच्या आईवर नेमके कोणते उपचार होत आहेत ही माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीये. शुक्रवारी संध्याकाळी […]

Mumbaitak
follow google news

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारच्या आईची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अक्षय कुमारच्या आईची तब्येत सध्या गंभीर असल्याचं कळतंय. आईची तब्येत बिघडल्याची बातमी समजताच अक्षय कुमार लंडनवरुन आपलं शुटींग सोडून मुंबईत दाखल झाला आहे.

हे वाचलं का?

अक्षय कुमारच्या आईवर नेमके कोणते उपचार होत आहेत ही माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीये. शुक्रवारी संध्याकाळी अक्षय कुमारच्या आईला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं कळतंय. अक्षय कुमार सोमवारी सकाळीच मुंबईत दाखल झाल्याचं कळतंय.

अक्षय कुमार सध्या इंग्लंडमध्ये सिंड्रेला या आपल्या आगामी सिनेमासाठी शुटींग करत होता. परंतू सध्याच्या शुटींगमध्ये अक्षय कुमारची गरज नसल्यामुळे अक्षयने आपल्या आईसोबत राहण्यासाठी तात्काळ मुंबई गाठल्याचं कळतंय.

    follow whatsapp