आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : आता जावेद अख्तरांनी उपस्थित केला सवाल; म्हणाले…

मुंबई तक

• 04:53 PM • 19 Oct 2021

मुंबईच्या समुद्र सीमेवर एका जहाजात सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीचा एनसीबीने पर्दाफाश केला होता. एनसीबीने या प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली आहे. दुसरीकडे एनसीबीच्या या कारवाईवर शंका उपस्थित केल्या जात आहे. दरम्यान, ड्रग्ज पार्टी प्रकरणावर आता प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी भाष्य केलं आहे. एनसीबीच्या मुंबईतील पथकाने 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील समुद्रात […]

Mumbaitak
follow google news

मुंबईच्या समुद्र सीमेवर एका जहाजात सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीचा एनसीबीने पर्दाफाश केला होता. एनसीबीने या प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली आहे. दुसरीकडे एनसीबीच्या या कारवाईवर शंका उपस्थित केल्या जात आहे. दरम्यान, ड्रग्ज पार्टी प्रकरणावर आता प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी भाष्य केलं आहे.

हे वाचलं का?

एनसीबीच्या मुंबईतील पथकाने 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील समुद्रात असलेल्या एका जहाजावर धाड टाकली होती. ड्रग्ज पार्टी उधळून लावत एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना अटक केली होती. या प्रकरणानंतर गुजरातमध्ये साडलेल्या ड्रग्ज प्रकरणाबद्दलही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या दोन्ही प्रकरणांवर जावेद अख्तर यांनी भूमिका मांडली.

आर्यन खान प्रकरणात NCB का आहे संशयाच्या भोवऱ्यात?

जावेद अख्तर म्हणाले, ‘एका पोर्टवर तुम्हाला एक बिलियन डॉलर किमतीचे कोकेन मिळते आणि दुसऱ्या ठिकाणी 1,200 लोक होते व तिथे 1,30,000 रुपये किमतीचा चरस-गांजा सापडला. 1,30,000 रुपयांचे ड्रग्ज राष्ट्रीय बातमी झाली. एक बिलियन डॉलर किंमत असलेल्या कोकेनबद्दलची हेडलाईन मी बघितलं नाही. त्याबद्दलची बातमी तर वर्तमानपत्राच्या 5व्या, 6व्या पानावर दिली जाते’, असं म्हणत जावेद अख्तर यांनी मार्मिक टोला लगावला.

Bangladesh Violence : हिंदूंवरील हल्ले आणि CAA चा शिवसेना-काँग्रेस संबंध का जोडतेय? समजून घ्या

बांगलादेशातील हिंदूवरील हल्ल्यांवरून शेख हसीना यांना सुनावलं

जावेद अख्तर यांनी ड्रग्ज पार्टी प्रकरणाबरोबरच बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली. ‘जिथे कुठे अल्पसंख्याकांवर अन्याय केला जातो, त्याबद्दल मला चिंता वाटते. बांगलादेशात हे घडतंय, ही लज्जास्पद बाब आहे. शेख हसीना उदारमतवादी नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्याच देशात हे होत आहे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे’, अशा शब्दात जावेद अख्तर यांनी बांगलादेश सरकारला सुनावलं.

आर्यन खानच्या जामीनावर उद्या फैसला?

ड्रग्ज पार्टी प्रकरणात सध्या ऑर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानच्या जामीनावर उद्या निर्णय होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आलेला असून, याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर 20 ऑक्टोबरला निकाल देण्यात येईल, असं न्यायालयाने म्हटलं होतं.

    follow whatsapp