भारत जोडो: काश्मिरात राहुल गांधींचं भाषण, लोकांना झाली पवारांची आठवण

मुंबई तक

30 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:10 AM)

Bharat Jodo Yatra Rahul Gandhi speech: श्रीनगर: महाराष्ट्रात (Maharashtra) 2019 साली झालेली विधानसभा (Vidhansabha) ही एका पावसातील (Rain) सभेमुळे प्रचंड गाजली होती. साताऱ्यात शरद पवारांच्या (Sharad Pawar) जाहीर सभेत झालेला पाऊस आणि त्याच पावसात भिजून भाषण करणारे शरद पवार यामुळे राज्यातील राजकीय वातावरण बदलून गेलं होतं. तेव्हापासून पाऊस आणि राजकीय नेते यांचं एक वेगळं समीकरण […]

Mumbaitak
follow google news

Bharat Jodo Yatra Rahul Gandhi speech: श्रीनगर: महाराष्ट्रात (Maharashtra) 2019 साली झालेली विधानसभा (Vidhansabha) ही एका पावसातील (Rain) सभेमुळे प्रचंड गाजली होती. साताऱ्यात शरद पवारांच्या (Sharad Pawar) जाहीर सभेत झालेला पाऊस आणि त्याच पावसात भिजून भाषण करणारे शरद पवार यामुळे राज्यातील राजकीय वातावरण बदलून गेलं होतं. तेव्हापासून पाऊस आणि राजकीय नेते यांचं एक वेगळं समीकरण पाहायला मिळत आहे. असं असताना आज (30 जानेवारी) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) तर चक्क बर्फाच्या पावसात उभे राहून भाषण करत असल्याचं पाहायला मिळालं. यामुळे पुन्हा पाऊस आणि सत्ताबदल या राजकीय चर्चेला जोर आला आहे. (bharat jodo yatra rahul gandhis speech in kashmir peoples Sharad Pawar was remembered)

हे वाचलं का?

त्याचं झालं असं की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेची आज श्रीनगरमध्ये सांगता झाली. याच ठिकाणी असलेल्या शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर यानिमित्ताने जाहीर सभा बोलविण्यात आली होती. जेव्हा राहुल गांधी हे भाषणासाठी उभे होते तेव्हाच बर्फवृष्टी सुरू झाली. त्याच बर्फवृष्टीमध्ये राहुल गांधी यांनी आपलं भाषण सुरू ठेवलं. यानंतर सोशल मीडियावर अनेकांना शरद पवारांनी केलेल्या पावसातील भाषणाची आठवण झाली.

भाषणात काय म्हणाले राहुल गांधी?

यावेळी राहुल गांधी म्हणाले, ‘मी गांधीजींकडून शिकलो आहे की, जर तुम्हाला जगायचे असेल तर तुम्हाला न घाबरता जगावे लागेल. मी चार दिवस इथे असाच फिरलो. पण मला जे वाटलं तेच इथे झालं. जम्मू-काश्मीरच्या लोकांनी मला हँड ग्रेनेड दिला नाही तर मला प्रेम दिलं… दिलखुलास प्रेम दिलं. मला आपलं मानलं.’

राहुल गांधी पुढे म्हणाले की, ‘मी ज्याप्रमाणे काश्मीरमध्ये चार दिवस पायी प्रवास केला तसं भाजपचा कोणताही नेता प्रवास करू शकत नाही. असं यासाठी नाही की, जम्मू-काश्मीरचे लोक त्यांना फिरू देणार नाहीत… तर यासाठी की, भाजपचे लोक घाबरले आहेत.

Bharat Jodo : राहुल गांधी दाढी का करत नाहीयेत?

‘मी रोज 8-10 किलोमीटर धावतो’

राहुल गांधी यावेळी असंही म्हणाले, ‘मी अनेक वर्षांपासून रोज 8-10 किलोमीटर धावतो. अशा परिस्थितीत कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालणे इतके अवघड जाणार नाही, मला थोडासा अंहकारही आला होता. माझ्या लहानपणी फुटबॉलदरम्यान माझ्या गुडघ्याला दुखापत झाली होती. कन्याकुमारीहून प्रवास सुरू झाला तेव्हा गुडघ्यात वेदना होत होत्या, पण नंतर काश्मीरमध्ये आल्यावर या वेदना संपल्या.’

BJP खासदार वरूण गांधींच्या काँग्रेस प्रवेशावर काय म्हणाले राहुल गांधी?

मला हिंसेची वेदना समजते

राहुल गांधी पुढे म्हणाले की, जी लोकं हिंसाचार घडवतात, त्यांना ते दुःख कळत नाही. पण मला ही वेदना समजते. ही वेदना मला अनेकदा समजली आणि जाणवली. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांचे काय झाले हे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना समजू शकत नाही. पण मी समजू शकतो.. जेव्हा मी अमेरिकेत होते तेव्हा मला एक फोन आला आणि मला सांगण्यात आलं की, माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली आहे. मला असं वाटतं की, असे फोन कॉल्स कोणत्याही जवानाच्या घरी कधीच जाता कामा नये. हे थांबलं पाहिजे.’

राहुल गांधी म्हणाले, ‘देशाचे विभाजन करणाऱ्या विचारसरणीच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. पण द्वेषाने नाही तर प्रेमाने उभे रहा. त्या विचारधारेचा आम्ही पराभव तर करणारच, पण त्यांची मनात असणारी द्वेषपूर्ण विचारधाराही समूळ उखडून टाकू.’ असं म्हणत राहुल गांधींनी आपल्या भारत जोडो यात्रेतील भाषणाचा समारोप केला.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची कन्याकुमारीपासून सुरुवात झाली होती. ज्यानंतर तब्बल 134 दिवसात पायी चालत 3570 किमी अंतर चालत राहुल गांधींनी काश्मीर गाठलं. त्यांच्या या पायी यात्रेचा काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीत बराच फायदा होईल असं म्हटलं जात आहे. आता या यात्रेचा नेमका काँग्रेसला कसा फायदा होईल येणाऱ्या काळात कळेलच. पण नेता म्हणून राहुल गांधी यांची इमेज मात्र या यात्रेमुळेच नक्कीच बदलली आहे.

    follow whatsapp