राहुल गांधींनी 41 हजारांचा टी-शर्ट घातल्याचा भाजपचा दावा; काँग्रेसकडूनही जोरदार प्रत्युत्तर

मुंबई तक

• 12:21 PM • 09 Sep 2022

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना त्यांच्या एका टी-शर्टमुळे भाजपने घेरले आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राहुल गांधींचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ते पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेले दिसत आहेत. हा टी-शर्ट बर्बेरी कंपनीचा असून त्याची किंमत 41, 257 रुपये असल्याचा दावा भाजपने केला आहे. राहुल गांधींनी सुप्रसिद्ध ‘व्हिलेज कुकिंग चॅनल’च्या […]

Mumbaitak
follow google news

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना त्यांच्या एका टी-शर्टमुळे भाजपने घेरले आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राहुल गांधींचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ते पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेले दिसत आहेत. हा टी-शर्ट बर्बेरी कंपनीचा असून त्याची किंमत 41, 257 रुपये असल्याचा दावा भाजपने केला आहे.

हे वाचलं का?

राहुल गांधींनी सुप्रसिद्ध ‘व्हिलेज कुकिंग चॅनल’च्या टीमची भेट घेतली

विशेष बाब म्हणजे खुद्द राहुल गांधी यांचा हा फोटो काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आला आहे. राहुल गांधी सध्या ‘भारत जोडो यात्रे’वर आहेत. या भेटीचे काही फोटो काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आले आहेत.फोटो शेअर करताना काँग्रेसच्या वतीने लिहिले आहे, राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान ‘व्हिलेज कुकिंग चॅनल’च्या टीमला भेटले. ‘व्हिलेज कुकिंग चॅनल’ हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खूप लोकप्रिय आहे. या चॅनेलचे YouTube वर सुमारे 18 दशलक्ष सदस्य आहेत.

राहुल गांधींच्या टी-शर्टची किंमत सांगून भाजपने डिवचलं

काँग्रेसने जारी केलेला फोटो भाजपने शेअर केला आहे. यासोबतच एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. यामध्ये राहुल गांधींचा टी-शर्ट बर्बेरीच्या टी-शर्टसारखा दिसतो. स्क्रीनशॉटमध्ये असे सांगण्यात आले आहे की हा टी-शर्ट बर्बेरी कंपनीचा आहे आणि त्याची किंमत 41,257 रुपये आहे. फोटो शेअर करताना भाजपकडून लिहिले की, भारतीयांनो, पहा!

काँग्रेसचं प्रत्युत्तर

नंतर काँग्रेसनेही भाजपची ही पोस्ट शेअर करत प्रत्युत्तर दिले. काँग्रेसने भाजपला टॅग करत ट्विट केले आहे. भारत जोडो यात्रेत जमलेली गर्दी पाहून, घाबरलात का? बेरोजगारी आणि महागाईवर बोला.जर कपड्यांबद्दल चर्चा करायची असेल तर मोदीजींचा 10 लाखांचा सूट आणि दीड लाखाचा चष्मा याबद्दल बोलू. सांगा काय करायचं? असं जोरदार प्रत्युत्तर काँग्रेसकडून देण्यात आलं.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, डर अच्छा लगा.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विट करून लिहिले, ‘दया येते… कन्याकुमारी ते काश्मीर, आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या भारत जोडो यात्रा’चे उत्तर, केंद्रातील सत्ताधारी पक्षाकडे ‘टी-शर्ट’ आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत एक पक्ष देशाला एकत्र आणत असताना, फूट पाडणारे पक्ष अजूनही टी-शर्ट आणि खाकी चड्डीत लटकत आहेत. भीती चांगली वाटली, असं बघेल यांनी लिहलं आहे.

    follow whatsapp