बाळासाहेबांच्या सुपुत्राने कोकणवासियांच्या तोंडाला पानं पुसली, भाजपची शिवसेनेवर बोचरी टीका

मुंबई तक

• 11:44 AM • 23 May 2021

Tauktae Cyclone ने महाराष्ट्रात कोकणकिनारपट्टीला चांगलाच तडाखा दिला. दोन दिवस सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे कोकणात सिंधुदुर्ग, मालवण, रत्नागिरी या भागांत आंबा बागायतदार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर नेत्यांचे वादळी दौरे सुरु झाले असून यावरुन राज्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. हे नुकसान आता भरुन निघणारं नाहीये! Taukte वादळाने कोकणातल्या शेतकऱ्याचं कंबरडं […]

Mumbaitak
follow google news

Tauktae Cyclone ने महाराष्ट्रात कोकणकिनारपट्टीला चांगलाच तडाखा दिला. दोन दिवस सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे कोकणात सिंधुदुर्ग, मालवण, रत्नागिरी या भागांत आंबा बागायतदार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर नेत्यांचे वादळी दौरे सुरु झाले असून यावरुन राज्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.

हे वाचलं का?

हे नुकसान आता भरुन निघणारं नाहीये! Taukte वादळाने कोकणातल्या शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका केली आहे. कोकणाच्या विकासासाठी राज्य सरकारने कान पिळेन अशी जाहीर ग्वाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती. त्याच कोकणात त्यांच्या सुपुत्राने कोकणवासियांच्या तोंडाला पानं पुसली असं म्हणत उपाध्ये यांनी जोरदार टीका केली आहे.

एकीकडे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस तीन दिवस कोकण दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक दिवसात कोकणाचा दौरा करुन शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळेल याची ग्वाही दिली. परंतू मुख्यमंत्र्यांच्या या धावत्या दौऱ्यावर विरोधी पक्षांनी चांगलीच टीका केली होती.

आपल्या कोकणदौऱ्याच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या आरोपाला उत्तर देताना मी विरोधीपक्षनेत्यांसारखा वैफल्यग्रस्त नसल्याचं म्हटलं होतं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणार नाही ते संवेदनशील आहेत. ते गुजरातला गेले, महाराष्ट्रात आले नाहीत याबद्दल चर्चा होते आहे. मात्र मला खात्री आहे के ते महाराष्ट्राला नक्की मदत करतील. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली त्याबद्दल जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की मी इथे विरोधकांच्या टीकेला उत्तर द्यायला आलेलो नाही मी वैफल्यग्रस्त नाही. मी माझ्या कोकणवासीयांना मदत करायला आलो आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर माझा कोकण दौरा जरी चार तासांचा असला तरीही जमिनीवर येऊन पाहणी करतो आहे हेलिकॉप्टरमधून नाही असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टोला लगावला.”

    follow whatsapp