इंदुरीकर महाराजांना दिलासा! वादग्रस्त वक्तव्य प्रकरणातील खटला रद्द

मुंबई तक

• 03:08 PM • 30 Mar 2021

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज अर्थात निवृत्ती महाराज देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुत्रप्राप्तीबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला खटला रद्द करण्यात आला आहे. इंदुरीकर महाराजांच्या वतीने संगमनेर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात अपील करण्यात आलं होतं. हे अपील न्यायालयाने मंजूर केलं. संगमनेर दिवाणी न्यायालयाने दिलेल्या प्रोसेस इश्यू विरोधात इंदुरीकर महाराजांनी अपील केलं होतं. […]

Mumbaitak
follow google news

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज अर्थात निवृत्ती महाराज देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुत्रप्राप्तीबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला खटला रद्द करण्यात आला आहे. इंदुरीकर महाराजांच्या वतीने संगमनेर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात अपील करण्यात आलं होतं. हे अपील न्यायालयाने मंजूर केलं. संगमनेर दिवाणी न्यायालयाने दिलेल्या प्रोसेस इश्यू विरोधात इंदुरीकर महाराजांनी अपील केलं होतं. यानंतर इंदुरीकर महाराजांच्या वतीने निकाल देण्यात आला आहे.

हे वाचलं का?

काय होतं इंदुरीकर महाराजांचं वक्तव्य?

स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते. स्त्रीसंग अशीव वेळेला झाला तर होणारं अपत्य खानदान मातीत मिळवणारं होतं. टायमिंग महत्त्वाचं आहे.. टायमिंग हुकलं की क्वालिटी खराब. पुलश्य नावाच्या ऋषीने केकसी नावाच्या स्त्रीशी सूर्यास्ताच्या वेळी संग केला तर रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण जन्माला आले.

इंदुरीकर महाराजांनी हे वक्तव्य केल्याने PCPNDT कायद्याच्या कलम २२ चं उल्लंघन केल्याचा आरोप झाला. त्यानुसार त्यांना अहमदनगर येथील PCPNDT च्या सल्लागार समितीने नोटीसही बजावली होती. या नोटीसला इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या वकिलांमार्फत बाजू मांडत उत्तरही दिलं होतं. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांनी नोटीस बजावली होती. त्यामध्ये प्रशासनाने गु्न्हा दाखल केल्यास तुम्हाला दोषी धरण्यात येईल असंही म्हटलं होतं. ज्यानंतर इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाला. इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनाचा व्हीडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. तसंच हा व्हीडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. ज्यावरून अनेकांनी इंदुरीकर महाराजांवर टीकाही केली होती.

इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही केली होती. आता न्यायालयाने इंदुरीकर महाराजांना दिलासा दिला आहे आणि त्यांच्या विरोधातला खटला रद्द केला आहे. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या निर्णयाविरोधात हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार असल्याचं म्हटलं आहे. न्यायालयाने हा निकाल दिल्यानंतर इंदुरीकर महाराजांच्या समर्थकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.

    follow whatsapp