धक्कादायक.. धूळवड साजरी केली, बेभान नाचला अन् घरी गेला; थोडयाच वेळात तरुणाचा मृत्यू!

मुंबई तक

• 06:00 AM • 19 Mar 2022

मिथिलेश गुप्ता, बदलापूर: धुलीवंदनाचा सण उत्साहात साजरा होत असताना बदलापूर मात्र एका 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आहे. आशुतोष संसारे हा तरुण धूळवड साजरी करताना बेभानपणे नाचला आणि त्यानंतर तो घरी गेला. पण धक्कादायक बाब म्हणजे अगदी थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला. आशुतोषच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूने त्याचा परिवाराला मोठा […]

Mumbaitak
follow google news

मिथिलेश गुप्ता, बदलापूर: धुलीवंदनाचा सण उत्साहात साजरा होत असताना बदलापूर मात्र एका 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आहे. आशुतोष संसारे हा तरुण धूळवड साजरी करताना बेभानपणे नाचला आणि त्यानंतर तो घरी गेला. पण धक्कादायक बाब म्हणजे अगदी थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

आशुतोषच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूने त्याचा परिवाराला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

बदलापूरच्या हेंद्रपाडा परिसरात शुभदन ही सोसायटी असून इथे होळी निमित्त संगीताचा तालावर सगळेच नाचत होते. आशुतोष देखील बेभानपणे नाचत होता. दरम्यान, नाचून झाल्यावर तो घरी गेला आणि त्याच्या अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्याच्या पत्नीने शेजाऱ्यांना याची माहिती दिली. शेजाऱ्यांनी देखील त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यानच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अवघ्या एका वर्षापूर्वीच आशुतोषचे लग्न झाले होते. त्यामुळे त्याच्या मृत्यूच्या वृत्ताने त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांना फार मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आशुतोषच्या मृत्यूचे कारण समजू शकले नसून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे बदलापूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान होळी सणाच्या दिवशी बदलापूर शहरात एक आत्महत्या आणि मृत्यूमुळे सणाला गालबोट लागले आहे.

नाचता-नाचता अचानक तरुणाने स्वत:च्याच छातीत भोसकला चाकू

इंदूरच्या बाणगंगा पोलीस स्टेशन हद्दीतील गोविंद कॉलनीमध्ये एका तरुणाला होळी साजरी करतानाच जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकीकडे होळी सुरु होती आणि दुसरीकडे तरुण बेधुंद होऊन नाचत होता. पण अचानक तरुणाने चाकू काढून नाचता नाचता स्वतःच्याच छातीवर वार केले. यावेळी गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले असून, ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही घटना इंदूरच्या बाणगंगा पोलीस स्टेशन परिसरातील गोविंद कॉलनीतील आहे. येथे राहणारा गोपाल (वय 38 वर्ष) हा तरुण होलिका दहनाच्या कार्यक्रमात डीजेवर नाचत होता. गाण्यावर नाचत असतानाच त्याने हातात चाकू घेतला आणि छातीवर वार करण्यास सुरुवात केली. यावेळी चाकू गोपालच्या छातीत खोलवर घुसल्याने त्याच्या छातीतून प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला.

होळी साजरी करु नका, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आदेश

दरम्यान, गोपाल याला मित्रांनी आणि नातेवाईकांनी जवळच्या रुग्णालयात दाखलही केले. पण चाकूचा घावा वर्मी बसल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नाचणाऱ्या सर्व तरुणांनी दारूचं सेवन केल्याचं सांगितलं जात आहे.

    follow whatsapp