चिंचवड पोटनिवडणूक 2023 : NCP, BJP मधील ही नावं चर्चेत, कोण आहे इच्छुक?

मुंबई तक

22 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:14 AM)

chinchwad assembly constituency by election 2023 : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman jagtap) यांचं दीर्घ आजाराने निधन झाल्यानं चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (chinchwad assembly constituency by election 2023) लागली आहे. पिंपरी चिंचवडची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसत आहे. त्यामुळे भाजपबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक जण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी […]

Mumbaitak
follow google news

chinchwad assembly constituency by election 2023 : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman jagtap) यांचं दीर्घ आजाराने निधन झाल्यानं चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (chinchwad assembly constituency by election 2023) लागली आहे. पिंपरी चिंचवडची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसत आहे. त्यामुळे भाजपबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक जण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत.

हे वाचलं का?

चिंचवड पोटनिवडणूक महाविकास आघाडी लढवणार? (Maharashtra By election 2023)

लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे अनुक्रमे चिंचवड विधानसभा मतदारसंघ आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. दोन्ही जागांवर बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांनी भाजपनं लढवलेल्या कोल्हापूर, पंढरपूर आणि देगलूर पोटनिवडणुकीचा उल्लेख करत बिनविरोधाची शक्यता फेटाळली आहे. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष कैलास कदम यांनीही काँग्रेस निवडणुकीत उतरणार असल्याचं म्हटलं आहे.

चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीबद्दल अजित पवार काय म्हणाले?

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही दोन्ही जागांवरील पोटनिवडणूक बिनविरोध होण्याबद्दल भूमिका मांडताना अप्रत्यक्षपणे बिनविरोध होण्याची शक्यता फेटाळून लावलेली आहे.

“सोमवारी, मंगळवारी मुंबईत बसून महाविकास आघाडी चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा करणार आहे. पिंपरी चिंचवडच्या बाबतीत तेथील पदाधिकारी कार्यकर्ते पवार साहेबांना भेटणार आहेत. माझ्याकडेही त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे.”

“भाजपकडून शंकर जगताप अथवा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचं नाव कळलं आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपची काही नावं पुढं येत आहेत. दिवंगत मुक्ता टिळक यांचे पतीही इच्छुक आहेत. भाजप त्याबाबत निर्णय घेईल.आम्ही त्यात नाक खुपसने गरजेचं नाही. मात्र दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवावी, अशी ईच्छा दोन्ही शहरातील आमच्या कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल का याबाबत मला शंका आहे”, अशी भूमिका अजित पवारांनी मांडलेली आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधून कोण आहेत इच्छुक?

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवण्यासाठी काही जण इच्छुक असून, त्यात भाऊसाहेब भोईर, नाना उर्फ विठ्ठल काटे, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, राजेंद्र जगताप यांची जास्त चर्चेत आहेत.

दुसरीकडे भाजपाकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप किंवा बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. राहुल कलाटे देखील या पोटनिवडणुकीची तयारी करत आहेत, मात्र त्यांनी अद्याप पक्ष सांगितलेला नाही.

chinchwad and kasba peth by election Date : 27 फेब्रुवारीला मतदान, 2 मार्च रोजी निकाल

कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झालेला आहे. 31 जानेवारी रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे असून, 7 फेब्रुवारी ही अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख आहे. 8 फेब्रुवारी अर्जांची छाननी आणि 10 फेब्रुवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. दोन्ही मतदारसंघात 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 2 मार्च रोजी निकाल घोषित होणार आहे.

    follow whatsapp