PM Modi: बाळासाहेबांच्या आवडीचा चाफा हार CM शिंदेंनी घातला PM मोदींना!

मुंबई तक

19 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:15 AM)

CM eknath shinde offered a special garland of sonchafa to PM Modi: मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची आज (19 जानेवारी) मुंबईत (Mumbai) जाहीर सभा पार पडली. मुंबईतील विविध विकासकामांचं उद्घाटन आणि काही प्रकल्पांचं लोकार्पण करुन पंतप्रधान मोदींनी जणू मुंबई महापालिका निवडणुकांचं (BMC Election) रणशिंग फुंकलं आहे. मात्र, या सगळ्यात स्टेजवरील एका गोष्टीने सर्वांचं […]

Mumbaitak
follow google news

CM eknath shinde offered a special garland of sonchafa to PM Modi: मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची आज (19 जानेवारी) मुंबईत (Mumbai) जाहीर सभा पार पडली. मुंबईतील विविध विकासकामांचं उद्घाटन आणि काही प्रकल्पांचं लोकार्पण करुन पंतप्रधान मोदींनी जणू मुंबई महापालिका निवडणुकांचं (BMC Election) रणशिंग फुंकलं आहे. मात्र, या सगळ्यात स्टेजवरील एका गोष्टीने सर्वांचं खास लक्ष वेधलं गेलं. ज्याची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (cm eknath shinde offered a special garland of sonchafa flowers to pm narendra modi)

हे वाचलं का?

बाळासाहेबाच्या आवडीच्या फुलांचा हार मोदींनाही घातला!

राज्यातील सत्तांतरानंतर पंतप्रधान मोदी हे आज पहिल्यांदाच मुंबईत आले. त्यामुळे भाजपसह (BJP) शिंदे गटाने (Shinde Group) मोदींचं प्रचंड जल्लोषात स्वागत केलं. मोदींच्या स्वागत समारंभात कोणतीही उणीव राहू नये यासाठी स्वत: मुख्यमंत्री जातीने लक्ष देत होते. स्वागत समारंभातील प्रत्येत बारीक-सारीक गोष्टीबाबत ते दक्ष होते आणि त्याच पद्धतीने त्याची आखणीही करण्यात आली होती.

‘लक्झमबर्गचे पंतप्रधान मोदी भक्त’; शिंदेंचा किस्सा, मोदींनाही हसू अनावर

पंतप्रधान मोदी हे व्यासपीठावर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठणीपासून बनवलेला परिधान मोदींना घातला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मोदींना शाल परिधान केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची एक मोठी प्रतिकृती भेट देण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांची एक छोटी प्रतिकृतीही मोदींना देण्यात आली.

यानंतर एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदींच्या गळ्यात एक खास हार घातला. जो बनविण्यात आलेल्या सोनचाफ्याने (sonchafa). खरं तर सोनचाफ्याची फुलं ही स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रचंड आवडीची होती. बाळासाहेबांच्या अनेक जाहीर सभांवेळी याच सोनचाफ्याच्या फुलांचा हार त्यांना घातला जात असे.

बाळासाहेबांना सोनचाफा प्रचंड आवडत असल्याचं अनेकांनी आतापर्यंत सांगितलं आहे. बऱ्याचदा त्यांच्या स्मृतीस्थळावर देखील हीच फुलं वाहून त्यांना आदरांजली देखील वाहिली जाते.

असं असताना, आज झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदेंनी थेट पंतप्रधान मोदींनाच चाफ्याचा हार दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

PM मोदींचं मुंबईत तडाखेबाज भाषण, ‘हे’ आहेत 10 महत्त्वाचे मुद्दे

‘बाळासाहेबांच्या आवडीचा चाफ्याचा हार…, असं म्हणा’

ज्यावेळी पंतप्रधान मोदींना घालण्यात येत होता तेव्हा निवेदन करणाऱ्यांना असंही सांगण्यात येत होतं की, बाळासाहेबांच्या आवडीचा चाफ्याचा हार तो मोदींना घालण्यात येत आहे असं म्हणा. मात्र निवदिकेने तसं न म्हणता फक्त विशेष चाफ्याचा हार देण्यात येत असून पंतप्रधान मोदींनी त्याचा स्वीकार करावा असं म्हटलं.

एकनाथ शिंदेंकडून मोदींचं तुफान कौतुक

दरम्यान, आजच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदींचं तुफान कौतुक केलं आहे. पाहा यावेळी एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले.

“आम्ही मोदींच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. या सरकारने सहा महिन्यात केलेली काम तुम्ही पाहिली असतील. आपण जे करतोय, त्यामुळे सगळ्यांना पोटदुखी उठलीये. मळमळ सुरू झालीये. पायाखालची वाळू सरकली आहे. छातीत धडकी भरलीये. हे सरकार एवढं काम करू शकतं, तर पुढच्या दोन वर्षात काय होईल? म्हणून याचा सगळ्यांना त्रास होतोय”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

“मी दावोसला गेलो होतो. दावोसमध्ये अनेक पंतप्रधान होते. मला ते मोदींबद्दल विचारत होते. तिथे लक्जमबर्गचे पंतप्रधान मला भेटले आणि ते म्हणाले, ‘मी मोदींचा भक्त आहे’. जर्मनी आणि इतर काही जण भेटले त्यांनी विचारलं की, ‘तुम्ही मोदींसोबत आहात ना?’ मी त्यांना सांगितलं की आम्ही मोदींचेच लोक आहोत. मोदींच्या लोकप्रियतेचा डंका दावोसमध्येही ऐकायला मिळाला”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदींची तोंड भरून स्तुती केली.

    follow whatsapp