पोषण आहाराच्या तांदळावर अधिकारी-पुरवठादारांकडून डल्ला? ५० किलोच्या गोणीत ३५-४० किलो तांदूळ

मुंबई तक

• 12:59 PM • 15 Mar 2022

– वसंत मोरे, बारामती प्रतिनिधी बारामती तालुक्यात सध्या शालेय पोषण आहारातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या तांदळात झालेल्या घोटाळ्याची चर्चा सुरु आहे. कोरोनाच्या काळामध्ये शालेय विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात आलेल्या पोषण आहारातून धान्याच्या ठेकेदारांनीच चोरी केल्याचं समोर आलंय. उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्या तालुक्यात ही घटना घडली असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद होत्या. त्यामुळे […]

Mumbaitak
follow google news

– वसंत मोरे, बारामती प्रतिनिधी

हे वाचलं का?

बारामती तालुक्यात सध्या शालेय पोषण आहारातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या तांदळात झालेल्या घोटाळ्याची चर्चा सुरु आहे. कोरोनाच्या काळामध्ये शालेय विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात आलेल्या पोषण आहारातून धान्याच्या ठेकेदारांनीच चोरी केल्याचं समोर आलंय. उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्या तालुक्यात ही घटना घडली असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले नव्हते. मात्र, गेल्या महिनाभरापासून शाळा सुरू झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील ऑगस्ट २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत शालेय पोषण आहाराचे वाटप सुरू करण्यात आले आहे. यामध्ये तांदूळ, हरभरा आणि मूग डाळीचे वाटप करण्यात येत आहे.

गृहमंत्री वळसे-पाटील यांच्या उत्तरावरुन नाना पटोलेंचा ठाकरे-पवारांकडे संताप

मात्र बारामती तालुक्यात वेगळंच चित्र पहायला मिळत आहे. ५० किलो तांदळाच्या गोणीमध्ये प्रत्यक्षात ३५ ते ५० किलो तांदुळ आढळून आला आहे. पुरवठादारांकडून शाळांमध्ये वाटप सुरू असताना बारामती तालुक्यातील अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयाच्या शिक्षकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर शिक्षकांनी वजन काटा आणून या पोत्यांचे वजन केले असता तांदळाच्या पोत्यावर ५० किलो वजनाचा बॅच असताना व प्रत्येक पोत्यांचे वजन ३५ ते ४० किलो इतकेच भरत असल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे असाच प्रकार पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्‍यात देखील समोर आला होता. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या ताटातला घास कोण हिरावतोय असा सवाल विचारला जात आहे.

बिबट्या जुन्नरचा अन् सफारी बारामतीला; शिवसेना-राष्ट्रवादी आमने सामने

याबाबत पंचायत समितीच्या शालेय पोषण विभागात माहिती देण्यात आल्यानंतर कमी पडलेला तांदूळ पुरवठादाराकडून उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, बारामती तालुक्यातील इतर शाळांमध्ये देखील असाच प्रकार झाल्याची माहिती समोर येत आहे. पुरवठादारांकडून तांदळाच्या पोत्या मधून दहा ते पंधरा किलो तांदूळ काढून त्याची चोरी केली जात असल्याचं समोर येतंय. गटशिक्षण अधिकारी संजय जाधव यांना या घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली असता त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

संबंधीत शाळेच्या शिक्षकांनी धान्य स्विकारताना ते मोजून ताब्यात घ्यावं. असे प्रकार घडत असतील तर त्या संबंधित पुरवठादाराची जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेकडे अहवाल पाठवून तक्रार केली जाईल असं जाधव यांनी सांगितलं.

उप-मुख्यमंत्री अजित पवार यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांवर उत्तम पकड मानली जाते. अनेकदा जाहीर कार्यक्रमांमध्ये अजित पवारांनी विकासकामांवरुन अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळे खुद्द बारामतीमध्येच घडलेल्या या प्रकारामुळे अजित पवार यात लक्ष घालून काही कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp