फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर सचिन वाझे म्हणतात…

राज्याच्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालचा दिवस हा मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे गाजला. विरोधी पक्षातील भाजपने सचिन वाझे यांच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करुन शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. सचिन वाझे आणि हिरेन यांची पूर्वीपासून असलेली ओळख आणि या प्रकरणातील त्यांच्यावर असलेला संशय पाहता सचिन वाझेंना तात्काळ निलंबीत करुन त्यांना अटक करावी अशी मागणी फडणवीसांनी केली. हिरेन […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 04:39 AM • 10 Mar 2021

follow google news

राज्याच्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालचा दिवस हा मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे गाजला. विरोधी पक्षातील भाजपने सचिन वाझे यांच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करुन शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. सचिन वाझे आणि हिरेन यांची पूर्वीपासून असलेली ओळख आणि या प्रकरणातील त्यांच्यावर असलेला संशय पाहता सचिन वाझेंना तात्काळ निलंबीत करुन त्यांना अटक करावी अशी मागणी फडणवीसांनी केली. हिरेन यांची कार ही ४ महिने सचिन वाझे यांच्याकडे होती असंही फडणवीस सभागृहात म्हणाले.

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर सचिन वाझे यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. “सभागृहातील झालेल्या चर्चांवर आणि आरोपांवर उत्तर देणं योग्य ठरणार नाही. फडणवीस हे विरोधीपक्षात आहेत त्यामुळे त्यांना जे काही बोलायचं आहे ते बोलू शकतात. कार बाळगणं हा काही गुन्हा नाहीये. माझ्यावर झालेले आरोप पाहून मग मी त्याचं उत्तर देईन.” विधानसभेत झालेल्या गदारोळानंतर सचिन वाझे यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेतली.

फडणवीसांनी मंगळवारी सभागृहात हिरेन यांच्या पत्नीचा जबाब वाचून दाखवत मनसूख यांची हत्या हिरेन यांनी केली असावी असा संशय व्यक्त केला. २००८ साली वाझे शिवसेना पक्षात सहभागी झाले होते…त्यामुळे सरकार वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला.

मनसुख हिरेन मृत्यू: सचिन वाझेंना तात्काळ अटक करा – देवेंद्र फडणवीस

    follow whatsapp