जावेद अख्तर यांनी अर्धच सत्य सांगितलं म्हणत धर्मेंद्र भडकले, वाचा नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबई तक

• 10:29 AM • 12 Oct 2022

नेहमीच कुल असणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा एक ट्विट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते गीतकार जावेद अख्तरवर भडकलेले दिसत आहेत. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी दावा केला होता की, जंजीर चित्रपटासाठी धर्मेंद्र यांची पहिली पसंती होती. त्यांनी हा चित्रपट नाकारला. जावेद अख्तर यांच्या या दाव्यावर धर्मेंद्र यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धर्मेंद्र का रागावले […]

Mumbaitak
follow google news

नेहमीच कुल असणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा एक ट्विट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते गीतकार जावेद अख्तरवर भडकलेले दिसत आहेत. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी दावा केला होता की, जंजीर चित्रपटासाठी धर्मेंद्र यांची पहिली पसंती होती. त्यांनी हा चित्रपट नाकारला. जावेद अख्तर यांच्या या दाव्यावर धर्मेंद्र यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?

धर्मेंद्र का रागावले होते?

धर्मेंद्र यांनी एक ट्विट शेअर केले, ज्यामध्ये जंजीर चित्रपटासाठी अमिताभ बच्चन हे शेवटचे पर्याय असल्याचे सांगण्यात आले होते. धर्मेंद्र आणि इतर कलाकारांनी हा चित्रपट नाकारला कारण त्याचा नायक चित्रपटात गंभीर, कणखर व्यक्तीसारखा दिसणारा हवा होता. यावर प्रतिक्रिया देताना धर्मेंद्र यांनी ट्विट केले आणि लिहिले, जावेद कैसे हो… दिखावे की इस दुनिया में हकीकत दबी रह जाती है. जीते रहो… दिलों को गुदगुदाना खूब आता है… काश सिर चढ़कर बोलने का जादू भी सीख लिया होता. दुसऱ्या ट्विटमध्ये लिहलंय की, मी जंजीर नाकारण्याचे कारण माझ्या भावनिक कारण होतं, ज्याचा मी यापूर्वी उल्लेख केला होता. त्यामुळे कृपया मला चुकीचे समजू नका. जावेद आणि अमित यांच्यावर माझे नेहमीच प्रेम आहे, असं त्यांनी लिहलंय.

धर्मेंद्र यांनी जंजीरमध्ये काम का केले नाही?

धर्मेंद्र यांनी टीव्ही शोमध्ये जंजीर नाकारण्याचे कारण सांगितले होते. धर्मेंद्र म्हणाले होते, मी जंजीर करू शकलो नाही याचं मला दुःखही आहे आणि आनंद हि. मी हा चित्रपट साडेसतरा हजारांना विकत घेतला. मला एक चुलत बहीण आहे, तिने क्रोधी हा चित्रपट बनवला. या चित्रपटासाठी तिने कधीतरी प्रकाश मेहरा यांच्याशी संपर्क साधला असावा. तेव्हा प्रकाशने नकार दिला असेल. तेव्हा माझी बहीण आली आणि मला शपथ दिली. बहिणीने मला भावनिक बंधनात बांधले. घरच्यांनीही नकार दिला. माझ्या बहिणीच्या सांगण्यावरून मी हा चित्रपट सोडला. शपथेने मला थांबवले. माझ्या बहिणीच्या प्रकाश मेहरा यांच्यावर नाराजी असल्याने मला हा चित्रपट सोडावा लागला. चित्रपट सोडताना मला खूप वाईट वाटले. नाहीतर तो माझा चित्रपट होता, असं धर्मेंद्र म्हणाले होते.

काय म्हणाले होते जावेद अख्तर?

जावेद अख्तर यांनी इंडिया टुडेशी संवाद साधताना सांगितले होते , जंजीर चित्रपटासाठी अमिताभ हे खरेतर शेवटचे पर्याय होते. धर्मेंद्रजींना डोळ्यासमोर ठेवून स्क्रिप्ट लिहिली होती. पण काही कारणांमुळे त्यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला. प्रकाश मेहरा यांच्याकडे स्क्रिप्ट होती पण नायक नाही. ते पहिल्यांदाच या चित्रपटाची निर्मिती करत होते, त्यापूर्वी त्यांनी दिग्दर्शन केले होते. नायकाच्या शोधात ते अनेक अभिनेत्यांकडे गेले पण सर्वांनीच चित्रपट नाकारला.

जंजीरमध्ये नायकाची अँग्री मॅन इमेज पाहायला मिळणार होती, या चित्रपटात ना रोमान्स होता ना कॉमेडी, त्यामुळे एकही हिरो साइन करत नव्हता. शेवटी अमिताभ बच्चन यांना कास्ट करण्यात आले. त्या काळात अमिताभ बॅक टू बॅक फ्लॉप देत होते, हे तुम्हाला माहीत असेलच. त्यांचा एकही चित्रपट चालत नव्हता. त्यानंतर जंजीर त्याच्यासाठी वरदान ठरला.हा चित्रपट सुपरहिट ठरला. या सिनेमाने अमिताभ यांची अँग्री यंग मॅन इमेज तयार केली, असं जावेद अख्तर म्हणाले होते.

    follow whatsapp