Ajit Pawar Shrinivas Patil Baramati Lok Sabha Updates : एकीकडे दीर आणि दुसरीकडे मुलगा असल्याने आई पुण्याला बहिणीकडे निघून गेली, असे अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी म्हटले होते. श्रीनिवास पवार यांनी केलेल्या विधानावर आता अजित पवारांनी उत्तर दिले. (Where was ajit pawar's mother?)
ADVERTISEMENT
अजित पवारांनी बारामती येथे अजित पवार यांनी आई आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह मतदान केले. त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.
आई तुमच्यासोबत नाहीये, असे श्रीनिवास पवार म्हणाले होते. त्यालाही अजित पवारांनी उत्तर दिले.
ते म्हणाले, "असं कुणी सांगितलं? या आरोपात काही तथ्य नाही. कोल्हापूरच्या टोलवर चेक करा. माझी आई कोल्हापूरला नव्हती. माझ्या एका नातेवाईकाचे पुण्यात लग्न होतं. जगदाळे म्हणून माझ्या आत्या आहेत. त्यांच्या मुलाच्या कार्यक्रमासाठी माझी आई पुण्यात होती. परंतू मी पुण्यात गेलो होतो, त्यावेळी ती म्हणाली की, अजित, मी तुझ्याबरोबर मतदानाला येणार आहे. तू मला येऊन मतदानाला घेऊन जायचं."
हेही वाचा >> 'अजितदादामुळे आई चक्क गाव सोडून पुण्याला..', श्रीनिवास पवारांनी मोठ्या भावाला सुनावलं!
"ती सहयोगला आलेली होती. सहयोगवरून मी आई आणि सुनेत्रा इथे आलो आहोत. आईचा मला आशीर्वाद आहे. आईचा मला पाठिंबा आहे. शेवटी ती माझी आई आहे. आमचा परिवार इतका मोठा आहे की, त्यामध्ये तीन फॅमिली आमच्याविरोधात होत्या. साहेबांची फॅमिली, श्रीनिवास पवारांची फॅमिली आणि राजेंद्र पवारांची फॅमिली. यांच्या व्यतिरिक्त कुणीही आमच्या विरोधात नव्हतं", असे ते म्हणाले.
हेही वाचा >> 'अजितदादा आणि तुम्ही एकत्र येणार?', पवार म्हणाले त्यांना पुन्हा...
"कारण नसताना माझ्या फॅमिलीला त्यात सहभागी करू नका. शेवटी प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने मते मागण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार आहे. त्यांनी सुरूवातीपासून मुलाखती कशा दिल्या, कसा प्रचार केला, ते बघितलं. भाषण कशी केली, तेही बघितलं. त्या भाषणांना मी महत्त्व देत नाही. प्रचार करायचा म्हणून करायचा. ज्यावेळी विधानसभेची निवडणूक लागेल, त्यावेळी कोण कुठे प्रचार करतंय, ते महाराष्ट्र बघेल", असे उत्तर अजित पवारांनी दिले.
पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा आरोप, अजित पवार काय म्हणाले?
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून रात्रभर पैसे वाटण्यात आले, बँक रात्रभर सुरू होती, असा आरोप रोहित पवारांनी केला. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, "हे काम निवडणूक आयोगाचे आहे. आजपर्यंत एक लोकसभा आणि सात विधानसभा निवडणुका मी लढवल्या आहेत. मी असले प्रकार कधी करत नाही. पहिल्यापासून विरोधकांतील काही बगलबच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते, पण मी त्याला फार महत्त्व देत नाही."
हेही वाचा >> करकरेंचा मृत्यू नेमका कोणाच्या गोळीमुळे? चार्जशीटमध्ये नेमकं काय?
"मी उद्या आरोप करू शकतो की त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडणुकीची हाताळणी केली. तुम्ही स्वतः डीपीसीसी बँक उघडी बघितली का? तो व्हिडीओ कालचा आणि त्यावेळचाच होता का?", असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला.
"तो आरोप करतोय ना समोरचा, त्याच्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तो आरोप करतोय. त्या आरोपांना महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. त्याला उत्तर देण्याची देखील मला गरज वाटत नाही", असे उत्तर अजित पवारांनी रोहित पवारांच्या आरोपांना दिले.
ADVERTISEMENT


 होम
होम राजकीय आखाडा
राजकीय आखाडा गुन्ह्यांची दुनिया
गुन्ह्यांची दुनिया शहर-खबरबात
शहर-खबरबात राशीभविष्य-धर्म
राशीभविष्य-धर्म पैशाची बात
पैशाची बात फोटो बाल्कनी
फोटो बाल्कनी हवामानाचा अंदाज
हवामानाचा अंदाज टॉपिक
टॉपिक

 
 









